MI vs SRH: टीम इंडियासाठी गुड न्यूज! सूर्यासह संघातील हे स्टार खेळाडू फॉर्ममध्ये परतले

Team India, ICC T20 World Cup 2024: सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने शानदार खेळी करत शतक साजरं केलं आहे.
Good news for team india ahead of t20 world cup 2024 suryakumar yadav and other batsmans back in form amd2000
Good news for team india ahead of t20 world cup 2024 suryakumar yadav and other batsmans back in form amd2000twitter

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाची घोषणा झाल्यानंतर भारतीय संघातील काही फलंदाज फ्लॉप कामगिरी करताना दिसून आले. मात्र आता भारतीय संघासाठी गुड न्यूज समोर आली आहे. संघात निवड झालेले खेळाडू फॉर्ममध्ये परारल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्यात सूर्यकुमार यादवचं देखील नाव जोडलं गेलं आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने शतकी खेळी केली आहे.

सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या १७४ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून सूर्यकुमार यादवने शानदार शतकी खेळी साकारली. त्याने ५१ चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि ६ षटकारांच्या साहाय्याने नाबाद १०२ धावांची खेळी केली. सूर्याच्या या तुफान खेळीचा मुंबई इंडियन्स संघाला फायदा होणार नसला तरीदेखील भारतीय संघाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. कारण आयपीएल २०२४ स्पर्धा झाल्यानंतर लगेचच टी -२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

Good news for team india ahead of t20 world cup 2024 suryakumar yadav and other batsmans back in form amd2000
MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

सूर्याचं हे या हंगामातील पहिलंच शतक ठरलं आहे. यापूर्वी विराट कोहली, यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मानेही शतक झळकावलं आहे. भारतीय संघातील टॉप ऑर्डरचे फलंदाज चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे भारतीय संघाची टी -२० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकण्याची शक्यता आणखी वाढली आहे.

Good news for team india ahead of t20 world cup 2024 suryakumar yadav and other batsmans back in form amd2000
IPL Points Table Update: KKR नंबर १, CSK ची टॉप ४ मध्ये एन्ट्री! LSG चं टेन्शन वाढलं; पाहा लेटेस्ट पॉईंट्स टेबल

मुंबईचा शानदार विजय..

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाकडून ट्रेविस हेडने ४८ धावांची खेळी केली. इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. सनरायझर्स हैदराबादला २० षटकअखेर १७३ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादवने शतकी खेळी केली. तर तिलक वर्मानेही महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com