IPL Points Table Update: KKR नंबर १, CSK ची टॉप ४ मध्ये एन्ट्री! LSG चं टेन्शन वाढलं; पाहा लेटेस्ट पॉईंट्स टेबल

IPL 2024 Points Table Update: आयपीएल २०२४ स्पर्धेत रविवारी (५ मे) झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने शानदार कामगिरी करत लखनऊ सुपर जायंट्स संघाला घरच्याच मैदानावर खेळताना ९८ धावांनी धूळ चारली आहे.
IPL Points Table Update: KKR नंबर १, CSK ची टॉप ४ मध्ये एन्ट्री! LSG चं टेन्शन वाढलं; पाहा लेटेस्ट पॉईंट्स टेबल
IPL 2024 latest points table update kkr cliched number 1 spot lsg csk amd2000twitter
Published On

आयपीएल २०२४ स्पर्धेत रविवारी (५ मे) झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने शानदार कामगिरी करत लखनऊ सुपर जायंट्स संघाला घरच्याच मैदानावर खेळताना ९८ धावांनी धूळ चारली आहे. या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या सामन्यापूर्वी पहिल्या स्थानी असलेला राजस्थान रॉयल्सचा संघ आता दुसऱ्या स्थानी सरकला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. तर ९८ धावांनी पराभूत झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ अव्वल स्थानी विराजमान..

या सामन्यातील विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मोठा फायदा झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांकडे प्रत्येकी १६-१६ गुण आहेत. मात्र कोलकाता नाईट रायडर्स संघाचा नेट रनरेट चांगला आहे. या संघाने ११ पैकी ८ सामने जिंकले आहेत. तर ३ सामने गमावले आहेत. यासह संघाचा नेट रनरेट +१.४५३ इतका आहे. तर राजस्थान रॉयल्स संघाने १० सामने खेळले आहेत. यादरम्यान ८ सामने जिंकले असून २ सामने गमावले आहेत. या संघाचा नेट रनरेट +०.६२२ इतका आहे.

IPL Points Table Update: KKR नंबर १, CSK ची टॉप ४ मध्ये एन्ट्री! LSG चं टेन्शन वाढलं; पाहा लेटेस्ट पॉईंट्स टेबल
Ramandeep Singh Catch: लखनऊमध्ये अवतरला 'सुपरमॅन' ; रमनदीपने २१ मीटर मागच्या दिशेने धावत टिपला IPL चा बेस्ट कॅच - Video

टॉप ४ मध्ये कोणते संघ?

रविवारी (५ मे) डबल हेडरचे सामने पार पडले. पहिल्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने आले होते. या सामन्यात चेन्नईने पंजाबला आपल्या होमग्राऊंडवर पराभूत करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. चेन्नईने आतापर्यंत ११ सामने खेळले असून ६ सामने जिंकले आहेत. तर ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. याआधी लखनऊचा संघ गुणतालिकेत टॉप ४ मध्ये होता. मात्र या सामन्यातील पराभवानंतर लखनऊचा संघ टॉप ४ मधून बाहेर पडला आहे.

IPL Points Table Update: KKR नंबर १, CSK ची टॉप ४ मध्ये एन्ट्री! LSG चं टेन्शन वाढलं; पाहा लेटेस्ट पॉईंट्स टेबल
MS Dhoni Record: वयाच्या ४२ व्या वर्षी धोनीचा मोठा कारनामा! IPL मध्ये असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच यष्टीरक्षक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com