Virat kohli heart warming gesture after receiving orange cap from dinesh karthik rcb vs gt match amd2000
Virat kohli heart warming gesture after receiving orange cap from dinesh karthik rcb vs gt match amd2000twitter

Virat Kohli Viral Video: मन जिंकलस भावा! दिनेश कार्तिकडून ऑरेंज कॅप स्वीकारताच विराटने केलं असं काही- Video

Virat Kohli- Dinesh Karthik Viral Video: बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गुजरात टायटन्स संघावर शानदार विजय मिळवला आहे.

बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गुजरात टायटन्स संघावर शानदार विजय मिळवला आहे. धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ४ गडी राखून विजय मिळवला. या विजयात विराट कोहलीने मोलाचं योगदान दिलं. त्याने ४२ धावांची खेळी करत पुन्हा एकदा ऑरेंज कॅपवर कब्जा केला आहे. दरम्यान ऑरेंज कॅप स्वीकारल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने हा सामना जिंकल्यानंतर दिनेश कार्तिकने विराट कोहलीला ऑरेंज कॅप दिली. ही ऑरेंज कॅप स्वीकारल्यानंतर कोहलीने मन जिंकणारं कृत्य केलं आहे. विराटने दिनेश कार्तिकचा मान ठेवत त्याला मानाचा मुजरा केला. विराटचा हा हटके अंदाज क्रिकेट चाहत्यांच्या पसंतीचा ठरतोय. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. नेटकरीही आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

Virat kohli heart warming gesture after receiving orange cap from dinesh karthik rcb vs gt match amd2000
PBKS vs CSK, IPL 2024: पंजाबला आव्हान देण्यासाठी चेन्नईच्या संघात मोठा बदल! अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

कोहलीचा ऑरेंज कॅपवर कब्जा.. विराट कोहलीने पुन्हा एकदा ऑरेंज कॅपवर कब्जा केला आहे. त्याने ११ सामन्यांमध्ये ५४२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४ अर्धशतक आणि १ शतक झळकावलं आहे. यादरम्यान ११३ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली आहे. तर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत १० सामन्यांमध्ये ५०९ धावा केल्या आहेत.

यादरम्यान १ शतक आणि ४ अर्धशतक झळकावले आहेत. तर आयपीएल २०२४ स्पर्धेतील गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ सातव्या स्थानी आहे. या संघाने ११ सामने खेळले आहेत. या संघाने ४ सामने जिंकले आहेत. तर राजस्थान रॉयल्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.

Virat kohli heart warming gesture after receiving orange cap from dinesh karthik rcb vs gt match amd2000
MI vs KKR, IPL 2024: KKR कडून एकटा वेंकटेश लढला! स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी मुंबईला १७० धावांची गरज

राजस्थान रॉयल्स संघाने १० सामने खेळले असून ८ सामने जिंकले आहेत. तर केवळ २ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसऱ्या स्थानी असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने १० पैकी ७ सामने जिंकले आहेत. तर लखनऊ सुपरजायंट्सचा संघ तिसऱ्या आणि सनरायझर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com