PBKS vs CSK, IPL 2024: पंजाबला आव्हान देण्यासाठी चेन्नईच्या संघात मोठा बदल! अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

Punjab Kings vs Chennai Super Kings Playing XI : आयपीएल स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जचा संघ आमने सामने येणार आहे.
PBKS vs CSK Playing XI prediction punjab kings vs chennai super kings playing 11 news in marathi amd2000
PBKS vs CSK Playing XI prediction punjab kings vs chennai super kings playing 11 news in marathi amd2000twitter

आयपीएल स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जचा संघ आमने सामने येणार आहे. १ मे रोजी दोन्ही संघ चेन्नईच्या होम ग्राऊंडवर आमने सामने आले होते. आज होणारा सामना हा पंजाब किंग्जच्या होम ग्राऊंडवर होणार आहे.

अशी असेल चेन्नई सुपर किंग्ज संघाची प्लेइंग ११..

चेन्नई सुपर किंग्ज संघातील वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना आणि महिश थिक्षणा या सामन्यातून कमबॅक करताना दिसून येऊ शकतात. गेल्या सामन्यात तुषार देशपांडे आणि मथीशा पथिराना खेळू शकला नव्हते. हे दोघेही या सामन्यातून कमबॅक करू शकतात.

चेन्नई सुपर किंग्ज: अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), डॅरिल मिचेल, मोइन अली, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टिरक्षक), शार्दुल ठाकुर, महेश थिक्षणा, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना

चेन्नई सुपर किंग्ज संघातील इम्पॅक्ट प्लेअर्स: समीर रिजवी, सिमरजीत सिंग, शेख रशीद, प्रशांत सोलंकी

PBKS vs CSK Playing XI prediction punjab kings vs chennai super kings playing 11 news in marathi amd2000
MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

अशी असू शकते पंजाब किंग्ज संघाची प्लेइंग ११..

पंजाब किंग्ज संघासाठी अजुनही प्लेऑफची वाट मोकळी आहे. या संघाने सलग विजय मिळवत सातव्या स्थानी झेप घेतली आहे. चेन्नईविरुद्ध होणाऱ्या सामन्यात जॉनी बेअरस्टो, सॅम करन, राइली रूसो, शशांक सिंह, जितेश शर्मा , आशुतोष शर्मा यांना संधी दिली जाऊ शकते. तर गोलंदाज म्हणून हरप्रीत बराड़, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग यांना संधी दिली जाऊ शकते.

जॉनी बेअरस्टो, सॅम करन (कर्णधार), राइली रूसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत बराड़, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग.

पंजाब किंग्स इम्पॅक्ट प्लेअर: हरप्रीत सिंग, लियाम लिविंगस्टन, प्रभसिमरन सिंग, ऋषी धवन, विधाथ कावेरप्पा.

PBKS vs CSK Playing XI prediction punjab kings vs chennai super kings playing 11 news in marathi amd2000
MI vs KKR, IPL 2024: KKR कडून एकटा वेंकटेश लढला! स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी मुंबईला १७० धावांची गरज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com