MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला.
MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला!  मुंबईचा विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली
MI vs SRH IPL 2024 mumbai indians beat sunrisers hyderabad by 7 wickets suryakumar yadav century tilak verma amd2000Twitter
Published On

समुद्राला लागूनच असलेल्या वानखेडे मैदानावर काहीसा गारवा असला तरी, मुंबईचा 'सूर्य' सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांवर अक्षरशः आग ओकत होता. चौकार-षटकारांची आतषबाजी करत सूर्यकुमारनं वर्माच्या मदतीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक' लावला. या विजयासह तळाला असलेल्या मुंबईनं प्लेऑफची समीकरणंच विस्कटून टाकली. हैदराबादनं दिलेलं १७४ धावांचं आव्हान मुंबईनं ७ विकेट आणि तब्बल १६ चेंडू राखून पार केलं.

मुंबई इंडियन्सला हा सामना जिंकण्यासाठी १७४ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी इशान किशन आणि रोहितची जोडी मैदानावर आली. मात्र या जोडीला हवी तशी सुरुवात करुन देता आली नाही.

मुंबईला २६ धावांवर पहिला धक्का बसला. इशान किशन अवघ्या ९ धावा करत माघारी परतला. त्यानंतर ४ धावा करत रोहितनेही पॅव्हेलियनची वाट धरली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेला नमन धीर शून्यावर माघारी परतला. शेवटी सूर्यकुमार यादवने आणि तिलक वर्माने संघाचा डाव सांभाळला. सूर्यकुमार यादवने शानदार खेळी करत १०२ धावा केल्या. तिलक वर्माने आणि सूर्यकुमार यादवने मिळून १४३ धावांची खेळी केली.

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला!  मुंबईचा विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली
MI vs SRH,IPL 2024: वानखेडेवर आज मुंबई- हैदराबाद भिडणार! पाहा प्लेइंग ११, पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

हैदराबादने केल्या १७३ धावा...

या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटकअखेर १७३ धावा केल्या. हैदराबादकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. तर अभिषेक शर्माने ११, मयांक अगरवालने ५,नितिश कुमार रेड्डीने २०,हेनरिक क्लासेनने २, मार्को यान्सेनने १७ धावा केल्या.

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला!  मुंबईचा विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली
MI vs SRH,IPL 2024: मुंबईच्या विजयासाठी हैदराबाद सोडून या ८ संघांचे देव पाण्यात! जाणून घ्या कारण

मुबंई इंडियन्स संघाकडून गोलंदाजी करताना हार्दिक पंड्याने ४ षटकात ३१ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. तर चावलाने ३३ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. जसप्रीत बुमराहने ४ षटकात २३ धावा खर्च करत १ गडी बाद केला. तर आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या अंशुलने ४२ धावा खर्च करत १ गडी बाद केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com