MI vs SRH,IPL 2024: मुंबईच्या विजयासाठी हैदराबाद सोडून या ८ संघांचे देव पाण्यात! जाणून घ्या कारण

MI vs SRH, Playoffs Scenario: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रोमांचक सामना रंगणार आहे. या सामन्यातील निकालावर बरंच काही अवलंबून असणार आहे.
MI vs SRH,IPL 2024: मुंबईच्या विजयासाठी हैदराबाद सोडून या ८ संघांचे देव पाण्यात! जाणून घ्या कारण
Mi vs srh match is important for these 8 teams know which team will get benefit amd2000twitter
Published On

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रोमांचक सामना रंगणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवल्यास इतर सर्व संघांना फायदा होणार आहे. तर हैदराबादसाठी देखील हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं आहे. कारण कुठल्याही संघाने आतापर्यंत प्लेऑफचं तिकीट मिळवलेलं नाही आणि कुठलाच संघ अजूनपर्यंत बाहेर पडलेला नाही. त्यामुळे सर्व संघांसाठी अजूनही प्लेऑफचे दार उघडे आहे.

मुंबईच्या विजयाने कोणाला फायदा होणार?

आज होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवला, तर चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, लखनऊ सुपर जायंट्स, कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज, गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा फायदा होणार आहे. म्हणजे सनरायझर्स हैदराबाद सोडून सर्वच संघांसाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे.

MI vs SRH,IPL 2024: मुंबईच्या विजयासाठी हैदराबाद सोडून या ८ संघांचे देव पाण्यात! जाणून घ्या कारण
IPL Points Table Update: KKR नंबर १, CSK ची टॉप ४ मध्ये एन्ट्री! LSG चं टेन्शन वाढलं; पाहा लेटेस्ट पॉईंट्स टेबल

सध्या हैदराबादचा संघ १२ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. जर हा सामना हैदराबादने जिंकला तर, हा संघ १४ गुणांनी प्लेऑफच्या दिशेने वाटचाल करेल. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी प्लेऑफमध्ये गाठणं कठीण होऊन जाईल.

MI vs SRH,IPL 2024: मुंबईच्या विजयासाठी हैदराबाद सोडून या ८ संघांचे देव पाण्यात! जाणून घ्या कारण
MS Dhoni Record: वयाच्या ४२ व्या वर्षी धोनीचा मोठा कारनामा! IPL मध्ये असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच यष्टीरक्षक

सध्या कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सचा संघ १६-१६ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. मात्र आज हैदराबाद जिंकली तर या दोन्ही संघांचं टेन्शन वाढू शकतं. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स संघासाठी प्लेऑफमध्ये पोहचण्याचा मार्ग खडतर आहे. जर हैदराबादने हा सामना जिंकला तर प्लेऑफमध्ये पोहचणं आणखी कठीण होऊन जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com