Mumbai Indians Playing XI: हैदराबादविरुद्ध अर्जुन तेंडुलकरला संधी मिळणार? पाहा कशी असेल मुंबईची प्लेइंग ११

MI vs SRH Playing 11, Arjun Tendulkar: आज होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.
Will Arjun Tendulkar gets chance in playing 11 for today's match know mi vs srh playing 11 amd2000
Will Arjun Tendulkar gets chance in playing 11 for today's match know mi vs srh playing 11 amd2000google

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला आयपीएल २०२४ स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. नुकताच कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईचा पुढील सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. मात्र सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे अर्जुन तेंडुलकरला संधी कधी मिळणार?

मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफमधून जवळजवळ बाहेर पडला आहे. या संपूर्ण हंगामात अर्जुन तेंडुलकरला एकही सामना खेळायची संधी मिळालेली नाही. हैदराबादविरुद्ध होणाऱ्या सामन्यात अर्जुनला संधी मिळणं कठीण आहे. कारण अजूनही मुंबईचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडलेला नाही. त्यामुळे मुंबईचा संघ आपल्या मजबूत प्लेइंग ११ सह मैदानात उतरू शकतो. जर या सामन्यात मुंबईने विजय मिळवला तर अर्जुनला पुढील सामन्यांमध्ये संधी मिळणं कठीण आहे.

Will Arjun Tendulkar gets chance in playing 11 for today's match know mi vs srh playing 11 amd2000
IPL Points Table Update: KKR नंबर १, CSK ची टॉप ४ मध्ये एन्ट्री! LSG चं टेन्शन वाढलं; पाहा लेटेस्ट पॉईंट्स टेबल

सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा पराभव झाला, तर मुंबईचा संघ या स्पर्धेतून अधिकृतरित्या बाहेर पडेल. त्यामुळे पुढील सामन्यांमध्ये मुंबईचा संघ आपल्या बाकावरील खेळाडूंना प्लेइंग ११ मध्ये स्थान देऊ शकतो. त्यावेळी अर्जुन तेंडुलकरचाही संघात समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे अर्जुनला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार की नाही, हे आज होणाऱ्या सामन्यावर अवलंबून असणार आहे.

Will Arjun Tendulkar gets chance in playing 11 for today's match know mi vs srh playing 11 amd2000
MI vs SRH,IPL 2024: वानखेडेवर आज मुंबई- हैदराबाद भिडणार! पाहा प्लेइंग ११, पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

या सामन्यासाठी अशी असू शकते मुंबई इंडियन्सची प्लेइंग ११..

रोहित शर्मा, ईशान किशन (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, नेहाल वढेरा, रोमारियो शेफर्ड, गेराल्ड कोएत्जी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com