MI vs SRH,IPL 2024: वानखेडेवर आज मुंबई- हैदराबाद भिडणार! पाहा प्लेइंग ११, पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

MI vs SRH, Match Details Playing 11 And Pitch Report: आयपीएल २०२४ स्पर्धेतील ५५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.
MI vs SRH IPL 2024 Head to head records playing 11 pitch report and match prediction amd2000
MI vs SRH IPL 2024 Head to head records playing 11 pitch report and match prediction amd2000google

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ५५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. मुंबई इंडियन्स संघाकडून हार्दिक पंड्या तर सनरायझर्स हैदराबाद संघाकडून पॅट कमिन्स संघाचं नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्यात कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? खेळपट्टी कोणाला देणार साथ? जाणून घ्या.

कशी असेल खेळपट्टी?

मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग समजली जाते. खेळपट्टी छोटी असल्याने या मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला जातो. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यातही चौकार षटकारांचा पाऊस पाहायला मिळू शकतो.

MI vs SRH IPL 2024 Head to head records playing 11 pitch report and match prediction amd2000
IPL Points Table Update: KKR नंबर १, CSK ची टॉप ४ मध्ये एन्ट्री! LSG चं टेन्शन वाढलं; पाहा लेटेस्ट पॉईंट्स टेबल

असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड..

मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहीला, तर दोन्ही संघ २२ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान मुंबई इंडियन्सने १२ वेळेस बाजी मारली आहे. तर सनरायझर्स हैदराबाद संघाला १० सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे.

MI vs SRH IPL 2024 Head to head records playing 11 pitch report and match prediction amd2000
Ramandeep Singh Catch: लखनऊमध्ये अवतरला 'सुपरमॅन' ; रमनदीपने २१ मीटर मागच्या दिशेने धावत टिपला IPL चा बेस्ट कॅच - Video

या सामन्यासाठी अशी असू शकते सनरायझर्स हैदराबाद संघाची प्लेइंग ११..

ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), एडन मार्करम, नीतीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, टी नटराजन, शाहबाज अहमद, अब्दुल समद, मयंक मार्कंडेय, भुवनेश्वर कुमार.

या सामन्यासाठी अशी असू शकते मुंबई इंडियन्स संघाची प्लेइंग ११..

इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com