SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Sunrisers Hyderabad Vs Rajasthan Royals/IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 50 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने जवळपास जिंकलेला सामना गमवला आहे. हैदराबादने राजस्थानचा अवघ्या 1 धावांनी पराभव केला.
SRH vs RR
SRH vs RR Saam Digital

आयपीएल 2024 च्या 50 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने जवळपास जिंकलेला सामना गमवला आहे. हैदराबादने राजस्थानचा अवघ्या 1 धावांनी पराभव केला. राजस्थानला सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज होती आणि रोव्हमन पॉवेल स्ट्राईकवर होता. मात्र भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर या खेळाडूला बाद केलं आणि हैदराबादने हा सामना एका धावेने जिंकला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 201 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात राजस्थानने 200 धावा केल्या.

तरीही राजस्थान अव्वल स्थानी

हैदराबादने आयपीएलच्या या सत्रातील 10 सामन्यांमध्ये ६ वा विजय नोंदवला. या विजयासह पॅट कमिन्सचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, राजस्थान संघाला या मोसमात दुसरा पराभव पत्करावा लागला असून गुणतालिकेत ते अव्वल स्थानावर आहेत.

हैदराबादच्या विजयात भुवनेश्वर कुमारचा सिंहाचा वाटा राहिला. त्याने सामन्यात तीन विकेट घेतल्या. भुवनेश्वरने पहिल्याच षटकात दोन बळी घेतले. त्याने जोस बटलर आणि संजू सॅमसनला खातेही न खोलता तंबूत धाडलं. यानंतर भुवनेश्वरने शेवटच्या षटकात आश्चर्यकारक कामगिरी केली. राजस्थानला 6 चेंडूत 13 धावा हव्या होत्या आणि तुफानी फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा रोव्हमन पॉवेल क्रीझवर होता. मात्र भुवनेश्वरने या खेळाडूलाही रोखलं. त्याने शेवटच्या चेंडूवर पॉवेलला बाद करून हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.प

SRH vs RR
ICC T20 World Cup 2024: विराट,सूर्या नव्हे तर हार्दिक ठरेल मॅचविनर! माजी भारतीय खेळाडूचा दावा

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २०२ धावांच लक्ष्य राजस्थान समोर ठेवलं होतं. नितेश कुमार रेड्डी आणि ट्रॅविश हेड यांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने २०२ धावांचा मोठा टप्पा गाठला. त्यात नितेश कुमार रेड्डीने ८ षटकार ठोकत ७६ धावा केल्या. तर ट्रॅविश हेडने ५८ धावांचं योगदान दिलं. क्लासेनने शेवटी ३ षटकार ठोकत १९ बॉलमध्ये ४२ धावा करत संघाला मजबूत धावसंख्या उभारून दिली आहे.

SRH vs RR
SRH vs RR, IPL 2024: हैदराबाद- राजस्थानमध्ये कोण मारणार बाजी? कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com