SRH vs RR, IPL 2024: हैदराबाद- राजस्थानमध्ये कोण मारणार बाजी? कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

SRH vs RR, Head To Head Record: आज होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. दरम्यान कसा राहिलाय या दोन्ही संघांचा रेकॉर्ड? जाणून घ्या.
srh vs rr ipl 2024 head to head record sunrisers hyderabad vs rajasthan royals record news in marathi
srh vs rr ipl 2024 head to head record sunrisers hyderabad vs rajasthan royals record news in marathi twitter

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ५० वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयमवर रंगणार आहे. हा सामना भारतीत वेळेनूसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होणार आहे. राजस्थानचा संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. तर दुसरीकडे हैदराबादचे फलंदाज धावांचा पाऊस पाडताना दिसून येत आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान कसा राहिलाय या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड? जाणून घ्या.

या दोन्ही संघांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. राजस्थान रॉयल्सचा रेकॉर्ड पाहिला, या संघाने आतापर्यंत ८ सामने जिंकले आहेत. आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवताच राजस्थान रॉयल्स संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे.

srh vs rr ipl 2024 head to head record sunrisers hyderabad vs rajasthan royals record news in marathi
IPL 2024 Points Table: चेन्नईला नमवत पंजाबची गुणतालिकेत मोठी झेप!या संघांचं टेन्शन वाढलं

असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड...

राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ १८ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान सनरायझर्स हैदराबाद संघाने ९ सामने जिंकले आहेत. तर राजस्थान रॉयल्स संघाने देखील ९ सामने जिंकले आहेत. आतापर्यंत दोन्ही संघांचा रेकॉर्ड बरोबरीत राहिला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून दोन्ही संघ आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

srh vs rr ipl 2024 head to head record sunrisers hyderabad vs rajasthan royals record news in marathi
IPL 2024: शिवम दुबेची अफलातून फलंदाजी; या बाबतीत दिग्गजांनाही सोडलं मागे

अशी असू शकते सनरायझर्स हैदराबाद संघाची प्लेइंग ११...

ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरीक क्लासेन (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक मरकंडे/शाहबाद अहमद, भुवनेश्वर कुमार,जयदेव उनाडकट, टी नटराजन

इ्म्पॅक्ट प्लेअर - अनमोलप्रीत सिंग

या सामन्यासाठी अशी असू शकते राजस्थान रॉयल्स संघाची प्लेइंग ११...

यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, रोवमेन पॉवेल, आर अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा.

इम्पॅक्ट प्लेअर- युजवेंद्र चहल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com