Rajasthan Royals Offer: .. तर जोस बटलर इंग्लंडला करणार राम राम! IPL फ्रँचायजीने दिली तब्बल इतक्या कोटींची ऑफर

Rajasthan Royals Jos Buttler: जोस बटलरला इंग्लंड क्रिकेट बोर्डसोबत असलेला करार सोडावा लागेल.
jos buttler
jos buttlersaam tv

Rajasthan Royals Offer To Jos Buttler: आयपीएल फ्रेंचायजी राजस्थान रॉयल्स एक मोठा डाव खेळण्याच्या विचारात आहे. सध्या आयपीएल स्पर्धेत संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व करतोय. आता राजस्थान रॉयल्सची फ्रेंचायजी इंग्लंडच्या टी -२० संघाचा कर्णधार जोस बटलरसह एक मोठा करार करण्याच्या विचारात आहे. या फ्रेंचायजीने जोस बटलरला कोट्यवधींची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे.

गुरुवारी(२९ जुन) द टेलिग्राफने ही माहिती दिली आहे. जर जोस बटलरने ही ऑफर स्वीकारली. तर त्याला इंग्लंड क्रिकेट बोर्डसोबत असलेला करार सोडावा लागेल.

jos buttler
ICC ODI WC 2023 Schedule: लागा तयारीला! ICC वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; या दिवशी रंगणार भारत- पाकिस्तान सामना

टी-२० क्रिकेटचा क्रेझ हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आता जगभरात अनेक मोठ्या लीग स्पर्धांचे आयोजन केले जाते. ज्यात भारतात असलेल्या आयपीएल फ्रेंचायजींनी देखील संघ खरेदी केले आहेत. हे फ्रेंचायजी आता या लीग स्पर्धा खेळण्यासाठी खेळाडूंसोबत करार करण्याच्या विचारात आहेत. या करारानुसार खेळाडूंना कोट्यवधींची ऑफर दिली जाईल. असे करार फुटबॉल खेळात केले जातात.

टेलिग्राफने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, राजस्थान रॉयल्सला जोस बटलरसोबत दीर्घकाळ करार करायचा आहे. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केली गेली नाही. जोस बटलर या कराराला मंजुरी देणार का, हे देखील स्पष्ट नाहीये. मात्र हे जवळ जवळ स्पष्ट आहे की, राजस्थान रॉयल जोस बटलरला मोठी ऑफर देणार आहे. (Latest sports updates)

jos buttler
Rishabh Pant Birth date: वर्ल्ड कपपूर्वी रिषभ पंतचा मोठा निर्णय! अचानक बदलली जन्मतारीख;कारण काय?

४ वर्षांचा करार करणार..

या वृत्तात म्हटले गेले आहे की, राजस्थान रॉयल्सने जोस बटलरला ४ वर्षांसाठी करार करण्याची ऑफर दिली आहे. मात्र अधिकृतरित्या कुठलीही माहिती समोर आली नाही. जोस बटलर या ऑफरचा स्वीकार करणार का? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.'

जोस बटलरने २०१८ मध्ये राजस्थान रॉयल्स संघात प्रवेश केला होता. त्याने आतापर्यंत ७१ सामन्यांमध्ये १८ अर्धशतके आणि ५ शतके झळकावली आहेत. तो दक्षिण आफ्रिक टी -२० लीग स्पर्धेत राजस्थान रॉयल्सच्या पार्ल रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएल स्पर्धेत त्याला १० कोटींची बोली लावत संघात स्थान देण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com