Rishabh Pant Re-Birth Date: वर्ल्ड कपपूर्वी रिषभ पंतचा मोठा निर्णय! अचानक बदलली जन्मतारीख;कारण काय?

Rishabh Pant Birth Date Changed: नुकताच तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.
rishabh pant
rishabh pantsaam tv
Published On

Rishabh Pant Instagram Bio: भारतीय संघाचा स्टार फलंदाज रिषभ पंत हा गेल्या काही महिन्यांपासुन संघाबाहेर आहे. जानेवारी महिन्यात त्याच्या कारचा अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता.

दरम्यान तो सोशल मीडियावर आपल्या रिकव्हरीचे अपडेट्स देत असतो. नुकताच तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

rishabh pant
Kamran Akmal On Sarfaraz Khan: सरफराज खानच्या समर्थनात पाकिस्तानी खेळाडूने घेतली धाव; रोहितवर हल्लाबोल करत म्हणाला...

रिषभ पंतने जन्म तारीख बदलली..

रिषभ पंतचा जन्म ४ ऑक्टोबर १९९७ रोजी झाला होता. यानुसार रिषभ पंत आता २५ वर्षांचा आहे. मात्र आता रिषभ पंतने आपल्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये असलेली जन्म तारीख बदलली आहे. त्याने आपली जन्म तारीख ५ जानेवारी २०२३ अशी केली आहे. अपघात झाल्यानंतर याच दिवशी तो शुद्धीत आला होता. त्यामुळे त्याने ही तारीख आपल्या बायोमध्ये लिहली आहे. त्याचं असं म्हणणं आहे की, याच दिवशी त्याचा पुर्नजन्म झाला होता. (Rishabh Pant Birthdate)

गेल्या वर्षी झाला होता अपघात.. (Rishabh Pant Car Accident)

रिषभ पंत हा दिल्लीकडून रुडकीच्या दिशेने जात असताना त्याच्या कारचा अपघात झाला होता. त्याच्यावर देहराडुनच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला मुंबईत शिफ्ट केलं गेलं होतं. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला स्वत:च्या पायावर चालता देखील येत नव्हतं. मात्र आता तो रिकव्हर होत असुन काही महिन्यात मैदानात खेळताना दिसुन येऊ शकतो. (Latest sports updates)

दुखापतग्रस्त असल्यामुळे रिषभ पंतला आयपीएल २०२३ स्पर्धेतुन माघार घ्यावी लागली होती. तसेच भारतीय संघातील स्थान देखील गमवावे लागले होते. त्याच्याऐवजी इशान किशन आणि केएस भरतला भारतीय संघात स्थान दिले गेले आहे. रिषभ पंत मैदानात केव्हा परतणार याबाबत कुठलीही अपडेट समोर आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com