KKR: बांगलादेशी खेळाडूची हकालपट्टी? बीसीसीआयचे शाहरुख खानला थेट आदेश

Mustafizur Rahman : सुरक्षेच्या चिंता आणि वाढत्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिजूर रहमानला केकेआरला सोडण्याचे निर्देश दिलेत. केकेआर संघ शाहरुख खानच्या मालकीचा आहे.
Mustafizur Rahman
Bangladeshi pacer Mustafizur Rahman during his stint with Kolkata Knight Riders.saam tv
Published On
Summary
  • बीसीसीआयने केकेआर व्यवस्थापनाला थेट आदेश दिले

  • मुस्तफिजुर रहमानला संघातून काढण्याचे निर्देश

  • बांग्लादेशातील परिस्थितीमुळे वाद निर्माण

कोलकाता नाईट रायडर्स संघातून बांगलादेशी मुस्तफिजुर रहमानला काढून टाकण्याचे आदेश बीसीसीआयने दिले. पण असं का? सविस्तर जाणून घेऊया.

नेमक काय झालं?

डिसेंबर २०२५, लिलावात केकेआरने मुस्तफिजुरला ९.२० कोटी रुपयांना खरेदी केले होते. मात्र, बांगलादेशातील राजकीय अस्थिरता आणि हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर भारतात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सोशल मीडियासह राजकीय स्तरावरून केकेआरचे मालक शाहरुख खान यांच्यावर टीकेची झोड उठली.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी अधिकृतपणे केकेआर व्यवस्थापनाला मुस्तफिजुरला तातडीने संघातून मुक्त करण्याचे निर्देश दिले.

हा केवळ क्रिकेटचा निर्णय नसून, 'राष्ट्र प्रथम' म्हणणाऱ्या स्वाभिमानी भारताचा कडक इशारा आहे! बांगलादेशात हिंदूच्या रक्ताने होळी खेळली जात असताना, तिथल्या खेळाडूंना कोट्यवधीच्या बोली लावून पोसणे हे १३५ कोटी भारतीयाच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच होते. अखेर जनभावनेचा उद्देक झाला आणि बीसीसीआयने शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सला चपराक लगावत मुस्तफिजुरला बाहेरचा रस्ता दाखवला. ज्यांना आपल्या बांधवांच्या वेदना कळत नाहीत, त्यांच्यासाठी भारतीय खेळपट्टीवर जागा नाही. हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com