

देशांतर्गत क्रिकेटसाठी नवीन नियम लागू करण्याची घोषणा
एमसीसीने सुचवलेल्या क्रिकेट नियमांचा समावेश
रणजी, विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली स्पर्धांमध्ये हे नियम लागू होतील.
बीसीसीआयनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये 'मॅरिलबोन क्रिकेट क्लब'ने सुचवलेले क्रिकेटचे नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. हे नवीन नियम रणजी करंडक, विजय हजारे करंडक आणि सय्यद मुश्ताक अली करंडक यांसारख्या स्पर्धांसह इतर देशांतर्गत स्पर्धांना लागू होणार आहेत. हे नियम फर्स्ट क्लास क्रिकेटमधील दिवसाच्या अखेरच्या ओव्हरपासून हेड कोचबाबत नवीन नियम करण्यात आलेत. इतकेच नाही तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये यष्टिरक्षकांच्या ग्लव्हजबाबत नवीन नियम लागू केले आहेत. यासह 'वाईड' चेंडूंशी संबंधित नवीन नियमही आणले जाणार आहेत.
नवीन नियमांनुसार, आता प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दिवसातील शेवटचे षटक पूर्ण करणे अनिवार्य आहे. जर शेवटच्या षटकादरम्यान एखादी विकेट पडली, तर खेळ तिथेच थांबणार नाही. नवीन फलंदाजाला दिवसातील शेवटच्या चेंडूपर्यंत फलंदाजी सुरू ठेवावी लागणार आहे. एकदिवसीय सामन्यांमधील 'ड्रिंक्स ब्रेक'दरम्यान मुख्य प्रशिक्षकाला मैदानावर प्रवेश करण्याची परवानगी मिळेल. जर एखाद्या खेळाडूने मुद्दाम कमी धावा घेतल्या, तर क्षेत्ररक्षण करणारा कर्णधार पुढील चेंडू कोणत्या फलंदाजाने खेळावा हे ठरवू शकेल.
आता डेडबॉल बाबतचाही नियम बदलण्यात आलाय. डेड बॉल देण्यासाठी गोलंदाज यष्टीरक्षकाजवळ किंवा यष्टीरक्षक त्याच्याजवळ असणं आवश्यक आहे. जर चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात असेल किंवा जमिनीवर पडलेला असेल, तर तो 'डेड' मानला जाईल. एकदिवसीय (ODI) आणि टी-२० सामन्यांसाठी 'लेग-साइड वाईड'बाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील. चेंडू टाकण्याच्या क्षणी सर्व क्षेत्ररक्षकांना बाउंड्रीच्या आत असणे अनिवार्य असणार आहे. गोलंदाजाच्या 'रन-अप' दरम्यान हातमोजे (ग्लोव्हज) पुढे ठेवल्यास यष्टिरक्षकांवर यापुढे दंड आकारला जाणार नाही.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. पहिला सामना २३ जुलै रोजी होणार आहे. भारतीय संघ झिम्बाब्वेमध्ये दाखल झाला असून, बीसीसीआयने त्यांच्या आगमनाचा एक व्हिडिओ शेअर केलाय. झिम्बाब्वे दौऱ्यासाठीच्या संघात प्रामुख्याने युवा खेळाडूंचा समावेश आहे. श्रेयस अय्यरकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने नवीन मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.