

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाचा २७ धावांनी दारूण पराभव झाला. विराट कोहलीने रोहित शर्माच्या तुफान फटकेबाजीनंतरही इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय संघाला ३६० धावाच बनवू दिलं. इंग्लंडच्या या विजयासह भारताच्या हातातून एकदिवशीय मालिका गेली आहे. भारतीय खेळाडूंपेक्षा इंग्लंडच्या खेळाडूंनी अधिक सराव अभ्यास केला होता,याची प्रचिती टी२० आणि एकदिवशीय सामन्यांमधून झाली आहे.
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला सलग दोन्ही मालिकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. टी-२० मालिकेत 'क्लीन स्वीप' झाल्यानंतर टीम इंडियाने एकदिवसीय मालिकाही गमावली आहे. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात, बेन डकेटचे शतक आणि सॅम करनची उत्कृष्ट गोलंदाजी यांच्या जोरावर इंग्लंडने टीम इंडियाचा २७ धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडने २-१ अशा फरकाने मालिका जिंकली.
लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडच्या ३८८ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली आहे. डोंगरासारख्या लक्षाचा पाठलाग करताना दडपणाखाली न येता कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने भारतीय डावाची सुरुवात अत्यंत आक्रमक पद्धतीने केली. दोघांनीही मैदानावर स्थिरावल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला. गिल आणि रोहित शर्माने १४७ धावांची भागिदारी करत भारताला अश्वासक सुरूवात करून दिली. गिलने ८४ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १० चौकार आणि १ षटकार लगावला.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात लॉर्ड्सवर इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीची दाणादाण उडवली. इंग्लंडने ५० षटकांत अवघ्या ३ गड्यांच्या मोबदल्यात ३८७ धावांचा डोंगर उभारला. लॉर्ड्सच्या मैदानावर एकदिवसीय क्रिकेटमधील हा कोणत्याही संघाचा सर्वोच्च स्कोअर ठरला आहे. नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा इंग्लंडचा निर्णय सलामीवीरांनी अगदी योग्य ठरवला. बेन डकेट आणि जेकब बेथेल या जोडीने भारतीय गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच हल्लाबोल केला.
बेन डकेट आणि जेकब बेथेल या जोडीने पहिल्या विकेटसाठी तब्बल १९२ धावांची ऐतिहासिक भागीदारी करत इंग्लंडला भक्कम पाया रचून दिला. सलामीवीर बेन डकेटने भारतीय आक्रमणाचा समाचार घेत १३५ चेंडूंमध्ये १८ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १४१ धावांची अप्रतिम शतकी खेळी केली. डकेटला उत्तम साथ देणाऱ्या जेकब बेथेलने ९३ चेंडूंत ९१ धावांची उत्कृष्ट खेळी केली. मात्र, शतक पूर्ण होण्याआधीच तो बाद झाला.
सलामीवीर बाद झाल्यानंतर अनुभवी ज्यो रूट आणि कर्णधार जोस बटलर यांनी धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. रूटने चौफेर फटकेबाजी करत अवघ्या ४८ चेंडूंत ९ चौकारांसह नाबाद ७४ धावा कुटल्या. शेवटच्या षटकांमध्ये जोस बटलरने भारतीय गोलंदाजांची लय पूर्णपणे बिघडवली. त्याने अवघ्या १३ चेंडूंत ३ चौकार आणि ३ षटकार खेचत नाबाद ४१ धावांची वादळी खेळी केली आणि इंग्लंडला ३८७ धावांपर्यंत पोहोचवले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.