MS Dhoni: हे वागणं बरं नव्हं! CSK चाहत्यांनंतर इरफान पठाणही माहीवर संतापला; म्हणाला, मी याचं समर्थन नाही...!

IPL CSK vs RCB Match : जेव्हा धोनी नवव्या स्थानावर बॅटिंगसाठी मैदानात आला, तेव्हा प्रचंड वादविवाद निर्माण झाला. सोशल मीडियावरही युजर्सने धोनीची खिल्ली उडवली. इरफान पठाणनेही त्याच्या नवव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याबद्दल नापसंती दर्शवली आहे.
IPL CSK vs RCB Match
IPL CSK vs RCB Match saam tv
Published On

शुक्रवारी चेपॉकवर झालेल्या सामन्यात चेन्नईला विजयाची गरज होती मात्र टीमचा अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी तरीही मैदानात लवकर उतरला नाही. या सामन्यात रविचंद्रन अश्विननंतर धोनी फलंदाजीसाठी उतरला तेव्हा चाहत्यांसह अनेक क्रिकेट तज्ञ आश्चर्यचकित झाले. चेन्नईला सामना जिंकण्यासाठी गरज असताना धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. हे पाहून सगळेच हैराण झाले. ज्यावेळी टीमला त्याची गरज होती, तेव्हा धोनी एवढ्या खालच्या फलंदाजीसाठी का उतरला, असा प्रश्ना सर्वांच्या मनात आहे.

ज्यावेळी धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला तेव्हा बराच गदारोळ झाला होता. सोशल मीडियावर देखील युजर्सने धोनीला ट्रोल केलं. त्याचबरोबर भारताचा माजी ऑलराऊंडर आणि एमएस धोनीसोबत खेळणारा इरफान पठाणनेही त्याच्या नवव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यावर नाराजी व्यक्त केलीये.

IPL CSK vs RCB Match
CSK vs RCB: ऋतुराजची एक चूक ठरली पराभवाचं कारण; कर्णधाराने 'या' खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

काय म्हणाला इरफान पठाण?

धोनीबाबत इरफान पठाणने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून एक पोस्ट केलीये. पठाण म्हणालाय की, मी धोनीच्या 9 व्या क्रमांकावर फलंदाजी करण्याच्या निर्णयाची बाजू कधीच घेणार नाही. हे संघासाठी योग्य नाही.

IPL CSK vs RCB Match
IPL 2025 : धोनीचा बालेकिल्ला RCBने केला नेस्तनाबूत; तब्बल १७ वर्षांनंतर चेपॉकवर CSKचा पराभव, माहीची जादू फेल

...तर चित्र काही वेगळं असतं

९व्या क्रमांकावर फलंदाजीला येत एमएस धोनीने 16 चेंडूत 187.50 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 30 रन्स केले. त्याने आपल्या डावात 3 फोर आणि 2 सिक्स लगावले. असं असलं तरीही धोनी फारच उशीरा मैदानात उतरल्याचं सर्वांचं म्हणणं आहे. जर तो थोडा वर फलंदाजीसाठी आला असता तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.

IPL CSK vs RCB Match
IPL 2025 : आयपीएल सुरु असतानाच वेळापत्रकात बदल, बीसीसीआयचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

सोशल मीडियावर धोनी ट्रोल

माजी कर्णधार एमएस धोनीच्या निर्णयाने सीएसके चाहते देखील चांगलेच संतापले होते. सोशल मीडियावरील कमेंट्सवरून त्यांना धोनीचा राग आल्याचं स्पष्टपणे दिसून येत होतं. 9व्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचा हा धोनीचा निर्णय होता. धोनीपूर्वी अश्विन फलंदाजीला आला तेव्हाही नाराज असलेल्या चाहत्यांचा राग आणखी वाढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com