CSK vs RCB: ऋतुराजची एक चूक ठरली पराभवाचं कारण; कर्णधाराने 'या' खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर
अखेर १७ वर्षांनंतर आरसीबीच्या टीमने चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध चेपॉकचा बालेकिल्ला भेदला सीएसके विरूद्ध आरसीबी या अगदी पैसा वसूल सामन्यात अखेर आरसीबीचा विजय झाला. १७ वर्षांनंतर आरसीबीने चेन्नई संघाला ५० रन्सने पराभूत केलं. या सामन्यात चेन्नईच्या फिल्डींगमध्ये खूप गोंधळ उडाल्याचं दिसून आलं. याच कारणामुळे टीमने ३ कॅच देखील सोडले. सामन्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडनेही पराभवासाठी फिल्डींगला जबाबदार धरलं.
रजत पाटीदारला मिळालं जीवनदान
आरसीबीसाठी फिलिप सॉल्ट आणि विराट कोहली यांनी टीमला चांगली सुरुवात करून दिली होती. सॉल्टने ३२ रन्सची खेळी केली तर कोहलीने ३१ रन्स केले. कर्णधार रजत पाटीदारनेही या सामन्यात चांगली खेळी केली. मात्र यावेळी सीएसकेची खराब फिल्डींग दिसून आली. त्याच्या ३ ओव्हरमध्ये ३ कॅच सोडण्यात आल्या. धोनी आणि जडेजा देखील यावर खूप नाराज दिसत होते.
सामन्यानंतर काय म्हणाला गायकवाड?
सामना हरल्यानंतर गायकवाड म्हणाला, 'खरं सांगायचं तर, मला अजूनही वाटतं की, या विकेटवर १७० रन्स एक चांगला स्कोर होता. फिल्डींगमधील वाईट कामगिरीने आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. जेव्हा तुम्ही १७० रन्सचा पाठलाग करत असता तेव्हा तुम्ही वेगळ्या पद्धतीने फलंदाजी करता. तुम्ही फलंदाजीला उतरता तेव्हा तुमच्याकडे थोडा वेळ असतो. ज्यावेळी तुम्ही अशा खेळपट्टीवर २० अतिरिक्त रन्सचा पाठलाग करत असता, तेव्हा तुम्हाला पॉवर प्लेमध्ये वेगळ्या पद्धतीने फलंदाजी करावी लागते.
फिल्डींगमध्ये सुधारणा करावी लागणार
गायकवाडने पुढे म्हटलं की, आम्ही मोठ्या फरकाने हरलो नाही आणि शेवटी फक्त ५० धावा झाल्या याचा अजूनही आनंद आहे. जेव्हा तुमच्या टीममध्ये तीन जागतिक दर्जाचे स्पिनर गोलंदाज असतात तेव्हा परिस्थिती वेगळी असते. आम्ही महत्त्वाच्या वेळी कॅच सोडले. शेवटच्या ओव्हरपर्यंत गती कायम राहिली.
गुवाहाटीला जाण्यासाठी खूप लांबचा प्रवास आहे, आम्हाला मानसिक तयारी करावी लागणार आहे. आयपीएलसारख्या स्पर्धेत आम्हाला फिल्डींगमध्ये खूप सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
ऋतुराजची ही चूक पडली महागात
या सामन्यात ऋतुराज गायकवाडने टॉस जिंकला आणि नंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याने घेतलेला हा निर्णय टीमच्या बाजूने गेला नाही. सीएसके गोलंदाज आरसीबीच्या फलंदाजांना मोठा स्कोर उभारण्यापासून रोखू शकले नाहीत. याशिवाय दुसऱ्या डावात आरसीबी गोलंदाजांनी सीएसकेच्या फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. चेपॉकमध्ये सामना जसजसा पुढे सरकतो तसतशी पीचवर रन्स करणं कठीण होतं. परंतु ऋतुराजने ज्या विचाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो यशस्वी झाला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

