IPL 2025 : आयपीएल सुरु असतानाच वेळापत्रकात बदल, बीसीसीआयचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

IPL 2025 News Update : बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीगच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने आयपीएल २०२५ च्या वेळापत्रकात कोणता मोठा बदल केला आहे? वाचा सविस्तर
IPL 2025 News Update
IPL 2025 News UpdateX (TWitter)
Published On

IPL 2025 News : सध्या भारतामध्ये इंडियन प्रीमियर लीगची चर्चा सुरु आहे. आयपीएल २०२५ मध्ये दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. अशातच आयपीएलसंबंधित नवी माहिती समोर आली आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या वेळापत्रकात कोणता बदल झालाय जाणून घेऊयात..

आयपीएलच्या १९ व्या सामन्याच्या वेळापत्रकामध्ये बीसीसीआयद्वारे बदल जाहीर करण्यात आला आहे. आयपीएल २०२५ मधील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स एकोणविसावा सामना हा ६ एप्रिल रोजी कोलकाताच्या ईडन गार्डन्स खेळवला जाणार होता. आता हा सामना मंगळवारी ८ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता खेळवला जाणार आहे. याव्यतिरिक्त वेळापत्रकामध्ये कोणताही बदल नसेल असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

IPL 2025 News Update
MS Dhoni Stumping : नॉर्मल वाटलोय का.. धोनीची वाऱ्याहून वेगवान स्टंपिंग, Video व्हायरल

कोलकाता शहरातील सणवारांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. बीसीसीआयच्या निर्णयामुळे ६ एप्रिल या डबल हेडरच्या दिवशी सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स हा एकच सामना खेळवला जाणार आहे.

IPL 2025 News Update
Virat Kohli Reaction : 6, 6, 6.. टीम डेव्हिडचे लागोपाठ 3 षटकार, विराटची 'ती' रिअ‍ॅक्शन व्हायरल, Video

रविवारच्या जागी मंगळवारी ८ एप्रिल रोजी डबल-हेडर सामने होतील. दुपारी ईडन गार्डन्स येथे कोलकाता विरुद्ध लखनऊ हा सामना दुपारी खेळवला जाईल. त्यानंतर संध्याकाळी त्याच दिवशी पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स हा सामना आधीच ठरलेल्या वेळेनुसार खेळला जाईल अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.

IPL 2025 News Update
Virat Kohli : पाथिराणाचा बाउन्सर जोरात विराटच्या हेल्मेटला लागला अन् विराट भडकला, पुढे जे घडलं... पाहा Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com