MS Dhoni Stumping : नॉर्मल वाटलोय का.. धोनीची वाऱ्याहून वेगवान स्टंपिंग, Video व्हायरल

MS Dhoni Video : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना चेन्नईमध्ये खेळला जात आहे. या सामन्यामध्ये महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा स्टंपिंगची जादू दाखवली आहे. त्याच्या स्टंपिंगचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
MS Dhoni Stumping Video
MS Dhoni Stumping Videox (twitter)
Published On

MS Dhoni IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स हा आयपीएलमधला रोमांचक सामना सुरु आहे. आरसीबी विरुद्ध सीएसके ही लढत पाहण्यासाठी चाहते आतुरले होते. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळला जात आहे.

पहिल्याच बॉलपासून फिल सॉल्टने दमदार खेळ करायला सुरुवात केला. विराट सावधगिरीने खेळ करत होता. त्याच दरम्यान जोरजार फटकेबाजी करण्याच्या नादात फिल सॉल्टची विकेट पडली. महेंद्रसिंह धोनीच्या स्टंपिंगपुढे सॉल्ट फेल झाला आणि १६ धावांवर ३२ धावा करुन माघारी परतला. दरम्यान धोनीच्या स्टंपिंगचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

MS Dhoni Stumping Video
Virat Kohli Salary: विराटच्या सॅलरीतून ८ कोटी कापणार; हातात १३ कोटी येणार; कारण..

नेमकं काय घडलं?

चौथ्या ओव्हरमध्ये नूर अहमद गोलंदाजी करण्यासाठी आला. नूर अहमदने टाकलेल्या शेवटच्या बॉलवर फिल सॉल्टने फटका मारण्यासाठी बॅट फिरवली. पण बॉल मिस होऊन स्टंप्सच्या मागे असलेल्या धोनीकडे गेला. एमएस धोनीने काही सेकंदांमध्ये बॉल स्टंप्सजवल नेत सॉल्टला बाद केले. अंपायर्सनी रिव्ह्यू घेतला आणि त्यानंतर रिव्ह्यूमध्ये सॉल्ट बाद झाल्याचे समोर आले.

बंगळुरूची प्लेईंग ११ -

विराट कोहली, फिल साल्ट, देवदत्त पडिकल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, यश दयाल.

चेन्नईची प्लेईंग ११ -

रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, सॅम करन, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मथिशा पाथिराणा, खलील अहमद.

MS Dhoni Stumping Video
David Warner In Movie: हातात लॉलीपॉप, हेलिकॉप्टरमधून एन्ट्री! वॉर्नरने 2.50 सेंकदाच्या या सीनसाठी घेतले तब्बल अडीच कोटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com