David Warner In Movie: हातात लॉलीपॉप, हेलिकॉप्टरमधून एन्ट्री! वॉर्नरने 2.50 सेंकदाच्या या सीनसाठी घेतले तब्बल अडीच कोटी

David Warner In Telugu Movie: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर तेलुगु चित्रपटात झळकला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
David Warner In Movie: हातात लॉलीपॉप, हेलिकॉप्टरमधून एन्ट्री! वॉर्नरने 2.50 सेंकदाच्या या सीनसाठी घेतले तब्बल अडीच कोटी
david warnertwitter
Published On

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरची भारतात प्रचंड क्रेझ आहे. त्याचं भारताप्रतीचं प्रेम आणि भारतातील लोकप्रियता पाहून त्याला आधारकार्ड देण्याचीही मागणी केली होती. आता तो चक्क तेलुगु चित्रपटात झळकला आहे. २८ मार्चला रॉबिनहूड हा तेलुगु चित्रपच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नरची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. कारण वॉर्नरने या चित्रपटातून टॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

David Warner In Movie: हातात लॉलीपॉप, हेलिकॉप्टरमधून एन्ट्री! वॉर्नरने 2.50 सेंकदाच्या या सीनसाठी घेतले तब्बल अडीच कोटी
CSK vs RCB,IPL 2025: RCB कडे इतिहास रचण्याची संधी; गेल्या १७ वर्षांत पहिल्यांदाच असं घडणार

रॉबिनहूड चित्रपटातील एक सीन तुफान व्हायरल होतोय. ज्यात वॉर्नरचा डेव्हिड भाई असा उल्लेख करण्यात आला आहे. या चित्रपटात वॉर्नरला गँगस्टरची भूमिका देण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वॉर्नर हेलिकॉप्टरमधून एन्ट्री घेताना दिसून येतोय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

David Warner In Movie: हातात लॉलीपॉप, हेलिकॉप्टरमधून एन्ट्री! वॉर्नरने 2.50 सेंकदाच्या या सीनसाठी घेतले तब्बल अडीच कोटी
IPL 2025: CSK vs RCB सामन्यावर पावसाचे सावट? आजचा सामना रद्द होणार? वाचा कसं असेल चेन्नईतील हवामान

वॉर्नर बनला डेव्हिड भाई

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तु्म्ही पाहू शकता की, एक भारतीय गँगस्टर डेव्हिड वॉर्नरला डेव्हिड भाई असं बोलताना दिसतोय. व्हिडिओ कॉलवर बोलताना तो म्हणतोय की, ' तू पोलिसांच्या तावडीत न सापडता खूप पैसे परत आणू शकतो का?...' वॉर्नरच्या या डायलॉगवर टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा पाऊस पडला. वॉर्नरने हेलिकॉप्टरमधून एन्ट्री केली. लो लॉलिपॉप घेऊन बाहेर आला जे पाहणं हास्यास्पद वाटतंय, पण फॅन्सला आवडतंय.

२ मिनिटांच्या सीनसाठी अडीच कोटी

माध्यमातील वृत्तानुसार, डेव्हिड वॉर्नरला २.५० मिनिटांचा हा सीन करण्यासाठी अडीच कोटी रुपये दिले गेले आहेत. यासह तो सर्वात महागडा कॅमिओ रोल करणारा अभिनेता ठरला आहे. वॉर्नर भारतातील मोठ्या पडद्यावर झळकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com