
आयपीएल २०२५ स्पर्धेतील आठवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल.
दोन्ही संघांनी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात शानदार विजयाची नोंद केली आहे. त्यामुळे दोन्ही संघ आत्मविश्वासाने भरपूर असणार आहेत. चेन्नईने पहिल्या सामन्यात मुंबईला पराभूत केलंय. आरसीबीने केकेआरला धूळ चारली आहे.
हा सामना क्रिकेट फॅन्ससाठी क्रिकेट फॅन्ससाठी क्रिकेटची मेजवानी असेल. कारण क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि एमएस धोनी एकमेकांविरुद्ध खेळताना दिसून येतील. आयपीएल २०२५ स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहे. हा सामना देखील हायव्हॉल्टेज होऊ शकतो. चेन्नईची खेळपट्टी पाहिली, तर ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे या मैदानावर मोठे फटके खेळणं सोपं जात नाही.
चेपॉकमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. आरसीबीचा संघ गेल्या १७ वर्षांपासून चेन्नईला चेन्नईत हरवू शकलेला नाही. या मैदानावरील रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ ९ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान आरसीबीला ८ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर केवळ एका सामन्यात आरसीबीला विजय मिळवता आला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून आरसीबीकडे इतिहास रचण्याची संधी असणार आहे.
कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?
एकूण सामने - ३३
चेन्नई सुपर किंग्ज संघाने जिंकलेले सामने - २१
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने जिंकलेले सामने - ११
नो रिझल्ट -१
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.