IPL 2025 RR vs KKR: क्विंटन डी कॉकच्या झंझावात खेळीने राजस्थानचा धुव्वा; KKR ने उघडलं विजयाचं खातं

IPL 2025 RR vs KKR : राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल 2025 हंगामातील सहावा सामना गुवाहाटी येथील स्टेडियमवर खेळला गेला.राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमावून 151 धावा केल्या.
IPL 2025 RR vs KKR
IPL 2025 RR vs KKR saamtv
Published On

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील सहावा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. क्विंटन डी कॉकची 61 चेंडूत 97 धावांची दमदार खेळी आणि त्याला मिळालेली रघुवंशीची साथ याच्या जोरावर केकेआरने 8 विकेट आणि अखेरचे 15 चेंडू राखत विजय मिळवला. राजस्थानचा पराभव करत केकेआरने आपल्या विजयाचं खातं उघडलंय. पहिल्या सामन्यात केकेआरला आरसीबीकडून पराभव पत्करावा लागला होता, पण दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करत विजय मिळवला.

गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सच्या संघाने 152 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्याचा पाठलाग केकेआरने 17.3 षटकांत दोन गडी गमावत पार केला. केकेआरचा फलंदाज क्विंटन डी कॉकने तुफानी फलंदाजी केली. त्याने 61 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 97 धावा केल्या.

प्रथम फलंदाजी करताना राजस्थानच्या संघाने 151 धावा केल्या होत्या. मात्र माफक वाटत असलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची दमछाक झाली. कमी आव्हान असल्याने केकेआरच्या संघाने संथगतीने खेळास सुरूवात केली. त्याचमुळे कारणामुळे आव्हान पार करण्यास संघाला 17 षटक खेळाव्या लागल्या.

राजस्थानने दिलेलं 152 धावांचं आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या केकेआरच्या संघाने संथ गतीने खेळाला सुरुवात केला. क्विंटन डी कॉक आणि मोईन अली कोलकाता नाईट रायडर्सकडून आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरले होते. मात्र राजस्थानच्या गोलंदाजांनी त्यांना मोठी खेळी करून दिली नाही. तीन षटकात त्यांना फक्त 20 धावा करता आल्या. कोलकाताला पहिला धक्का मोईन अलीच्या रुपात मिळाला.

मोईन अली फक्त 5 धावा करू शकला. त्यानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य राहणे फलंदाजीसाठी आला. पण त्यालाही मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार म्हणून त्याने नेतृत्त्व चांगलं केलं. पण फलंदाजी करण्यात तो अपयशी ठरला. अजिंक्य रहाणे 15 चेंडूत 18 धावा करून बाद झाला.

यानंतर डी कॉकने रघुवंशी यांनी डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी केली. केकेआरला शेवटच्या तीन षटकात 17 धावांची गरज होती. तेव्हा डी कॉकने जोफ्रा आर्चरच्या 18 व्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर एक चौकार आणि दोन षटकार मारत केकेआरला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com