IPL 2025: शतक हुकलं पण डी कॉकने इतिहास रचला! KKR साठी असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच फलंदाज

Quinton De Kock Record: राजस्थानविरुद्ध झालेल्या सामन्यात क्विंटन डी कॉकचं शतक थोडक्यात हुकलं. मात्र त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
IPL 2025: शतक हुकलं पण डी कॉकने इतिहास रचला! KKR साठी असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच फलंदाज
quinton de kocktwitter
Published On

गुवाहटीमध्ये झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. हा सामना हाय व्हॉल्टेज होणार, असं वाटलं होतं. मात्र क्विंटन डी कॉकच्या शानदार खेळीच्या बळावर कोलकाताने या सामन्यात एकतर्फी विजयाची नोंद केली. क्विंटन डी कॉक शेवटपर्यंत टीकून राहिला.

त्याने या डावात धावांचा पाठलाग करताना, ६१ चेंडूंचा सामना करत ९७ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ८ चौकार आणि ६ षटकार मारले. या खेळीच्या बळावर त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. दरम्यान त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची देखील नोंद झाली आहे.

IPL 2025: शतक हुकलं पण डी कॉकने इतिहास रचला! KKR साठी असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच फलंदाज
IPL 2025 RR vs KKR: क्विंटन डी कॉकच्या झंझावात खेळीने राजस्थानचा धुव्वा; KKR ने उघडलं विजयाचं खातं

क्विंटन डी कॉकने रचला इतिहास

क्विंटन डी कॉकला या डावात शतक झळकावण्याची संधी होती. मात्र त्याचं शतक अवघ्या ३ धावांनी राहून गेलं. शतक हुकलं असलं, तरीदेखील त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. क्विंटन डी कॉक हा कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून धावांचा पाठलाग करताना सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला आहे

IPL 2025: शतक हुकलं पण डी कॉकने इतिहास रचला! KKR साठी असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच फलंदाज
IPL 2025 Live : श्रेयस 97 वर असताना शशांकने स्ट्राईक का दिली नाही? इनिंग संपल्यावर स्पष्टचं सांगितलं, शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडलं?

यासह त्याने मनिष पांडेचा ११ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. आयपीएल २०१४ स्पर्धेतील फायनलमध्ये मनिष पांडेने ९४ धावांची खेळी केली होती. यासह कोलकाताला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

IPL 2025: शतक हुकलं पण डी कॉकने इतिहास रचला! KKR साठी असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच फलंदाज
IPL 2025: नवा कर्णधार, जुनी गोष्ट! पराभवानंतर ऋषभ पंतवर भर मैदानात संतापले संजीव गोएंका? Video झाला व्हायरल

कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी धावांचा पाठलाग करताना सर्वात मोठी खेळी करणारे फलंदाज

१. क्विंटन डी कॉक- ९७ धावा ( विरुद्ध राजस्थान रॉयल्स, २०२५)

२. मनिष पांडे - ९४ धावा ( विरुद्ध किंग्ज इलेव्हेन पंजाब, २०१४)

३. ख्रिस लिन - ९३ धावा (विरुद्ध गुजरात लायन्स, २०१७)

४. मनविंदर बिस्ला - ९२धावा ( विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, २०१३)

५. गौतम गंभीर - ९० धावा (विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, २०१६)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com