IPL 2025: CSK vs RCB सामन्यावर पावसाचे सावट? आजचा सामना रद्द होणार? वाचा कसं असेल चेन्नईतील हवामान

CSK vs RCB, Weather Report: आज होणाऱ्या सामन्यावर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यादरम्यान कसंं असेल हवामान? जाणून घ्या.
IPL 2025: CSK vs RCB सामन्यावर पावसाचे सावट? आजचा सामना रद्द होणार? वाचा कसं असेल चेन्नईतील हवामान
CSK VS RCBsaam tv
Published On

आयपीएल २०२५ स्पर्धेत आज आणखी एक हाय व्हॉल्टेज सामने पाहायला मिळणार आहेत. चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ भिडणार आहेत.हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल. या दोन्ही संघांच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला.

तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपल्या पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पराभव केला आहे. त्यामुळे दोन्ही संघ आपला दुसरा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या चेन्नईतील वातावरण कसं असेल.

IPL 2025: CSK vs RCB सामन्यावर पावसाचे सावट? आजचा सामना रद्द होणार? वाचा कसं असेल चेन्नईतील हवामान
IPL 2025: शतक हुकलं पण डी कॉकने इतिहास रचला! KKR साठी असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच फलंदाज

चेन्नईत पाऊस थैमान घालणार?

चेन्नई आणि बंगळुरुच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी अशी की, या सामन्यादरम्यान पाऊस पडणार नाही. या सामन्यावेळी तापमान ३० डिग्री सेल्सिअस इतकं असेल. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळेल.

IPL 2025: CSK vs RCB सामन्यावर पावसाचे सावट? आजचा सामना रद्द होणार? वाचा कसं असेल चेन्नईतील हवामान
IPL 2025 Live : श्रेयस 97 वर असताना शशांकने स्ट्राईक का दिली नाही? इनिंग संपल्यावर स्पष्टचं सांगितलं, शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडलं?

पाऊस पडणार नाही, हे तर स्पष्ट झालं. पण प्रश्न असा उपस्थित होतो की, या सामन्यात गोलंदाजांची चांदी पाहायला मिळणार? की फलंदाज धावांचा पाऊस पाडणार? चेपॉकची खेळपट्टी पाहिली, तर ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी नेहमीच फायदेशीर ठरते. त्यामुळे फलंदाजांना सहज मोठे फटके खेळता येत नाहीत. त्यामुळे फिरकी गोलंदाजांना विकेट्स मिळण्याची शक्यता अधिक असते.

IPL 2025: CSK vs RCB सामन्यावर पावसाचे सावट? आजचा सामना रद्द होणार? वाचा कसं असेल चेन्नईतील हवामान
IPL 2025 RR vs KKR: क्विंटन डी कॉकच्या झंझावात खेळीने राजस्थानचा धुव्वा; KKR ने उघडलं विजयाचं खातं

गेल्या हंगामात एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ही जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली होती. गेल्या हंगामापासून तोच या संघाचं नेतृत्व करतोय. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी रजत पाटीदारकडे आहे. दोन्ही नवे कर्णधार आहेत. त्यामुळे कोणता कर्णधार बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com