अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये एकमेव कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे. हा सामना होस्ट करण्यासाठी बीसीसीआयने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डला मदतीचा हात दिला. हा सामना नोएडा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळण्याचं ठरलं. मात्र या सामन्यातील पहिला दिवस (९ सप्टेंबर) पावसामुळे धुतला गेला.
दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना होईल, असं वाटलं होतं. मात्र खेळपट्टी ओली असल्याने हा सामना सुरुच होऊ शकला नाही. स्पर्धेतील पहिला दिवस टॉस न होताच समाप्त झाला. दरम्यान या सामन्याच्या आयोजनावरुन दिग्गज खेळाडू भडकल्याचे पाहायला मिळाले आहे.
या सामन्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंचे सराव सत्र होणार होते. मात्र दोन्ही संघांचे सराव सत्र पावसामुळे पूर्ण होऊ शकले नाही. सोमवारी रात्री पावसाने हजेरी लावली होती. पूर्ण दिवस आभाळ मोकळं होतं. दिवसा पाऊस पडलाच नाही, तरीदेखील सामन्याला सुरुवात होऊ शकली नाही. अंपायर्सने पूर्ण दिवसातून ७ ते ८ वेळा मैदानात जाऊन पाहणी केली. मात्र मिड विकेट आणि मिड ऑनचा विकेट ओला होता, म्हणून सामन्याला सुरुवात होऊ शकली नाही.
सुविधांचा अभाव पाहून,अफगाणिस्तानचा कोच जोनाथन ट्रॉट नाराज झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सामन्यातील पहिला दिवस टॉस न होताच रद्द केला गेला. उर्वरीत ४ दिवस ९८ षटकांचा खेळ होईल. तर हा सामना सकाळी ९:३० वाजता सुरु होईल.
बीसीसीआयने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डला मदतीचा हात दिला खरा, पण स्टेडीयममध्ये सुविधांचा अभाव दिसून आला. सराव सत्र सुरु असताना, मैदान सुकवण्यासाठी फॅनचा वापर करण्यात आला होता. यासह खेळाडूंना वीज आणि पाण्याच्या सुविधांचाही सामना करावा लागला. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डच्या अधिकाऱ्याने म्हटले की, ' खूप गडबड आहे. आम्ही इथे परत कधीच येणार नाही. खेळाडूही इथे दिल्या जाणाऱ्या सुविधांमुळे असमाधानाही आहेत. आम्ही आधीच बोलणं केलं होतं आणि स्टेडियमच्या लोकांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की, सर्व काही ठीक असेल.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.