Work From Home: वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू होणार? PM मोदींच्या आवाहनानंतर चर्चांना उधाण

PM Modi On Work From Home: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना वर्क फ्रॉम होमचे आवाहन केले. पीएम मोदी यांच्या या आवाहनानंतर देशभरातील कर्मचारी वर्गामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
Work From Home: वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू होणार? PM मोदींच्या आवाहनानंतर चर्चांना उधाण
PM Modi On Work From HomeSaam Tv
Published On

Summary -

  • पीएम मोदींनी इंधन बचतीसाठी वर्क फ्रॉम होमचा सल्ला दिला

  • अमेरिका-इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या

  • पेट्रोल-डिझेलचा काटकसरीने वापर करण्याचे पीएम मोदींचे आवाहन

अमेरिका आणि इराण या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका भारताला बसत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तेलंगणा येथील सभेत बोलताना देशातील नागरिकांना महत्वाचे आवाहन केले. पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्यासाठी आणि परकीय चलन वाचवण्यासाठी वर्क फ्रॉम होम आणि अशाच इतर उपाययोजना पुन्हा लागू करण्याचे आवाहन त्यांनी केले. या संकटाच्या काळामध्ये प्रत्येक भारतीयाने आपले कर्तव्य व्यवस्थित बजावले पाहिजे आणि या उपाययोजनांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे त्यांनी जनतेला सांगितले. पीएम मोदी यांनी वर्क फ्रॉम होमचा उल्लेख केल्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

इंधनाचा वापर काटकसरीने करा -

पीएम मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले होते की, इंधनाचा वापर कमी करण्यासाठी व्हर्चुअल मीटिंग, ऑनलाइन काम, मेट्रो प्रवास, कारपूलिंग आणि इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर केला पाहिजे. कोरोनाच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन मीटिंग आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यांसारख्या प्रणालींचा अवलंब केला. आता पुन्हा त्याच पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे झाले आहे. पेट्रोल, गॅस आणि डिझेल यांचा अत्यंत काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे.

Work From Home: वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू होणार? PM मोदींच्या आवाहनानंतर चर्चांना उधाण
Work From Home : जर तुम्हीही वर्क फ्रॉम होम करताय? तर या सवयी टाळा

कच्च्या तेलाची आयात करणारा जगातील तिसरा देश -

पीएम मोदी यांच्या या आवाहनानंतर कोरोनाच्या काळात देशात लागू केलेल्या लॉकडाऊनच्या उपाययोजना पुन्हा लागू करण्याची गरज का आहे? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. पीएम मोदी यांनी वर्क फ्रॉम होमचे आणि पेट्रोल-डिझेलचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन अशावेली केले आहे जेव्हा अमेरिका-इराणच्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅलर १०५ डॉलरच्या वर गेल्या आहेत. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे ज्याठिकाणी कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. या युद्धामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे भारतातही पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे.

Work From Home: वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू होणार? PM मोदींच्या आवाहनानंतर चर्चांना उधाण
Work From Home Jobs For Women: महिलांसाठी वर्क फ्रॉम होम जॉब्स, घरबसल्या झटक्यात कमवा लाखो रूपये

इराण- अमेरिकेतील युद्ध पेटलं -

इराण-अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीचे शस्त्रीकरण केले आणि त्यातून होणारी जलवाहतूक थांबवली आहे. याठिकाणावरूनच कच्च्या तेलाचा साठा भारतासह इतर देशांमध्ये जातो. सामुद्रधुनीतून जलवाहतूक व्यवस्थित सुरू नसल्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. यामुळे भारतात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा शांतात प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे तणाव आणखी वाढला. नाकेबंदी उठवली नाही तर कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी वाढ करण्याचा इशारा इराणने दिला आहे. याच परिस्थितीचा आढावा घेऊन पीएम मोदी यांनी देशातील नागरिकांना आवाहन केले. कारण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तेलाच्या किमती १०० डॉलरच्या वर राहिल्या तर येत्या काळात भारतातील अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

Work From Home: वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू होणार? PM मोदींच्या आवाहनानंतर चर्चांना उधाण
PM Modi: महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना शिक्षा मिळणार, PM मोदींनी दिला थेट इशारा

पीएम मोदींनी का केले वर्क फ्रॉम होमचे आवाहन?

पीएम मोदींनी देशातील नागरिकांना कार्यालयात जाण्याऐवजी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला. त्यांनी खासगी गाड्यांऐवजी मेट्रो, इलेक्ट्रिक वाहने आणि कारपूलिंगचा वापर करण्याचा सल्ला दिला. तसंच, परकीय चलन वाचवण्यासाठी नागरिकांनी वर्षभर सोने खरेदी करू नये, असे देखील आवाहन केले आहे. भारतीयांनी अनावश्यक परदेश प्रवास टाळावा, मालवाहतुकीसाठी रस्ते वाहतुकीऐवजी रेल्वेचा वापर करण्याचा सल्लाही दिला. वर्फ फ्रॉम होमने रोजच्या प्रवासाची गरज कमी होईल त्यामुळे इंधनाचा वापर, हवाई प्रवास आणि रस्त्यांवरील वाहतूक कमी होईल.

Work From Home: वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू होणार? PM मोदींच्या आवाहनानंतर चर्चांना उधाण
PM Modi: भारतावर मोठं संकट? वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन मिटिंग सुरू करा; PM मोदींच्या आवाहनामागे काय अर्थ दडलाय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com