

तमिळनाडूमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आलीये. यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहून घरीच प्रसूती करण्याचा प्रयत्न एका कुटुंबाने केला आणि या गंभीर चुकीमुळे एका तरुण महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आसपासच्या परिसरातील लोकांना मोठा धक्का बसला आहे.
ही घटना तिरुप्पूर जिल्ह्यातील उथुकुली इथल्या थलावैपलयम गावातील आहे. याठिकाणी शशिकला नावाची महिला राहत होती. तिचा पहिली प्रसूती अनुभव सिझेरियन ऑपरेशनद्वारे झाली होती. त्यामुळे यावेळी नॉर्मल डिलिव्हरी व्हावी अशी तिची आणि कुटुंबाची इच्छा होती. पण ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेण्याऐवजी एक धोकादायक निर्णय घेतला.
शशिकलाचे पती कार्तिक यांनी यूट्यूबवर प्रसूतीसंबंधी अनेक व्हिडिओ पाहिले आणि त्यावरून घरीच डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न सुरू केला. या प्रक्रियेत त्यांच्यासोबत शशिकलाची सासूही सहभागी होती. कोणत्याही डॉक्टरांच्या उपस्थितीशिवाय हा प्रसूतीचा प्रयत्न घरातच सुरू झाला.
मात्र हा प्रयत्न अत्यंत धोकादायक ठरला. प्रसूतीदरम्यान बाळाची नाळ (umbilical cord) योग्य प्रकारे वेगळी झाली नाही आणि त्यामुळे शशिकलाला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव (ब्लीडिंग) सुरू झाला. परिस्थिती झपाट्याने गंभीर होत गेली.
तिची तब्येत बिघडत असल्याचं लक्षात आल्यानंतर तिला तातडीने पेरुंदुरईच्या सरकारी रुग्णालयात नेलं. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला कोयंबटूरच्या एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी शशिकलाचा जीव वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आलं नाही.
रविवारी शशिकलाचा मृत्यू झाला. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे नवजात बाळाला डॉक्टरांनी सुरक्षितपणे वाचवलं असून ते सध्या सुरक्षित आहे.
या घटनेची माहिती मिळताच उथुकुली पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे. शशिकलाचा मृत्यू हा निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप करत तिचे पती कार्तिक आणि कुटुंबातील सदस्यांवर चौकशी सुरू करण्यात आलीये. या प्रकरणात पती आणि सासू जबाबदार असल्याचे प्राथमिक तपासात मानलं जातंय
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.