Crime: बायकोचे शेजारच्यासोबत अनैतिक संबंध, बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये महिलेने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली. झोपलेल्या नवऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं.
Crime: बायकोचे शेजारच्यासोबत अनैतिक संबंध, बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं
Uttar Pradesh Crime Saam Tv
Published On
  • उत्तर प्रदेशातील बागपत तरुणाची निर्घृण हत्या

  • बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने केली नवऱ्याची हत्या

  • झोपलेल्या नवऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळलं

  • तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

उत्तर प्रदेशमध्ये बायकोने नवऱ्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली. उत्तर प्रदेशच्या बागपत येथे ही मन हेलावून टाकणारी घटना घडली. बायकोचे दुसऱ्या तरुणासोबत विवाहबाह्य संबंध होते. लग्नाच्या १० वर्षांनंतर बायकोने नवऱ्याला बॉयफ्रेंडच्या मदतीने जिवंत जाळलं. उपचारादरम्यान सातव्या दिवशी या तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिनाउली भागातील बिजवाडा गावात घडली. राजीव नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली. राजीवच्या बायकोचे शेजारी राहणाऱ्या विक्रांतसोबत प्रेमसंबंध होते. राजीवने या प्रेमसंबंधाला विरोध केला. त्याने अनेकदा बायकोची समजूत काढली. पण ती विक्रांतच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की तिने नवऱ्याच्या हत्येचा कट रचला.

Crime: बायकोचे शेजारच्यासोबत अनैतिक संबंध, बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं
Crime News: आजारी पत्नीला औषधाऐवजी पाजलं विष; पाच महिन्यांनंतर उलगडलं हत्येचं गूढ, पतीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

२० जून रोजी जेव्हा राजीव कामावरून घरी आला तेव्हा त्याने बायकोसोबत जेवण केले. त्यानंतर तो आपल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेला. त्याची बायको आपल्या तीन मुलांसोबत दुसऱ्या खोलीमध्ये झोपली होती. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास तिने बॉयफ्रेंड विक्रांतला फोन केला. विक्रांत पेट्रोल घेऊन आला. दोघे राजीवच्या खोलीत गेले आणि त्यांनी त्याच्या अंगावर पेट्रोल ओतले. पेट्रोल अंगावर ओतल्यानंतर राजीव जागा झाला आणि तो जोरजोरात ओरडत खोलीबाहेर पळू लागला. त्यावेळी त्याच्या बायकोने काडीपेटी पेटवून त्याच्या अंगावर टाकली.

Crime: बायकोचे शेजारच्यासोबत अनैतिक संबंध, बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं
Crime: बायको अन् २ मुलांची हत्या, नंतर तरुणाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारत संपवलं आयुष्य

बायकोनेच आपल्या नवऱ्याला जिवंत जाळले. या घटनेत राजीव ८० टक्के भाजला. कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचारादरम्यान सातव्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे राजीवच्या कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी राजीवची बायको आणि तिच्या बॉयफ्रेंडविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

Crime: बायकोचे शेजारच्यासोबत अनैतिक संबंध, बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं
Delhi Crime: दिल्ली हादरली! १० वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, मृतदेह जंगलात नेऊन फेकला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com