Crime: संभाजीनगर हादरले! रॅप साँग गाण्यावरून कडाक्याचे भांडण, १० जणांनी धारदार शस्त्राने वार करत तरुणाला संपवलं

Sambhajinagar Crime: संभाजीनगरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. रॅप साँगवरून झालेल्या वादातून ही घटना घडली. पोलिसांनी १२ जणांना अटक केली.
Crime: संभाजीनगर हादरले! रॅप साँग गाण्यावरून कडाक्याचे भांडण, १० जणांनी धारदार शस्त्राने वार करत तरुणाला संपवलं
Sambhajinagar CrimeSaam Tv
Published On
  • संभाजीनगरमध्ये रॅप साँगवरून तरुणाची हत्या

  • दारूच्या नशेत वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला

  • वेदांतनगर पोलिसांनी 12 आरोपींना अटक

  • या घटनेमुळे संभाजीनगर हादरले

माधव सावरगावे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. रॅप साँग गाण्यावरून झालेल्या वादातून १० जणांनी तरुणाचा जीव घेतला. या भरस्त्यात तरुणाला बेदम मारहाण करत आणि जीवघेणा हल्ला करत हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संभाजीनगर हादरले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस सध्या तपास करत आहेत. पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे १२ जणांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये रॅप साँग गाण्यावरून एका मित्राच्या टोळक्याने तरुणाची हत्या केल्याची घटना घडली. मित्रांसोबत दारू प्यायला बसल्यावर रॅप साँग कोण चांगले गातो या किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. बघता-बघता प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. ३ विरुद्ध १० अशी दोन गटात मारामारी सुरु झाली. खोलीतील भांडण काही क्षणात रस्त्यावर गेले. भरपावसात तरुणांच्या गटांमध्ये फ्रिस्टाइल हाणामारी झाली.

Crime: संभाजीनगर हादरले! रॅप साँग गाण्यावरून कडाक्याचे भांडण, १० जणांनी धारदार शस्त्राने वार करत तरुणाला संपवलं
Crime: दुचाकीला कट मारल्याचा राग डोक्यात गेला, तरुणाला दगड अन् लोखंडी रॉडने हात-पाय तुटेपर्यंत मारहाण

यादरम्यान १० जणांच्या गटाने तिघांच्या गटातील २० वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला करत त्यांची निघृण हत्या केली. या हल्ल्यात शेखर ऊर्फ पिया देविदास लहाने याचा मृत्यू झाला. रेल्वे स्टेशन परिसरातील राजनगर भागात रात्री हा रक्तरंजित थरार घडला. या प्रकरणी वेदांतनगर ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी १२ आरोपींना अटक केली आहे.

Crime: संभाजीनगर हादरले! रॅप साँग गाण्यावरून कडाक्याचे भांडण, १० जणांनी धारदार शस्त्राने वार करत तरुणाला संपवलं
Crime: बायको अन् २ मुलांची हत्या, नंतर तरुणाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारत संपवलं आयुष्य

छत्रपती संभाजी नगर शहरात रात्रीच्या वेळी नशेतून होणाऱ्या गुन्हेगारीत चिंताजनक वाढ झाली आहे. अवघ्या महिनाभरात दारूच्या नशेतून झालेली ही दुसरी हत्याकांडाची घटना आहे. यापूर्वी ३१ मेच्या रात्री सिडको भागात एकाची हत्या करण्यात आली होती. या हल्ले, हत्याच्या घटनामुळे संभाजीनगरमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Crime: संभाजीनगर हादरले! रॅप साँग गाण्यावरून कडाक्याचे भांडण, १० जणांनी धारदार शस्त्राने वार करत तरुणाला संपवलं
Dombivli Crime: तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण, संतप्त नागरिकांनी धडा शिकवला; डोंबिवलीतील संतापजनक घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com