Crime News : १५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, ४८ वर्षाच्या यूट्यूबरला अटक

Crime News : १५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ४८ वर्षाच्या यूट्यूबरला आणि त्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
Crime:
CrimeSaam Tv
Published On

West Bengal Rape Case : पश्चिम बंगालमध्ये बलात्काराची आणखी एक संतापजनक घटना घडली आहे. ४८ वर्षाच्या यूट्यूबरने आणि त्याच्या मुलाने नववीत शिकणाऱ्या १५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार (West Bengal Rape Case) केल्याची धक्कादायक घटना समोर आली. डान्स आणि कॉमेडी रील काढण्याचे आमिष दाखवत बलात्कार केल्याचा आरोप आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी बाप आणि मुलाला बेड्या ठोकल्यात.

पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगना जिल्ह्यात बलात्काराची ही संतापजनक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी ४८ वर्षाच्या यूट्यूबर अरबिंदु मोंडल याला अटक केली आहे. अरबिंदु मोंडल याचे यूट्यूबवर 4.3 मिलियन (43 लाख) फॉलोवर्स आहेत. पोलिसांनी अरबिंदु याला कोर्टात हजर केले असता पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अरबिंदु याच्या मुलाला बाल सुधारगृहात पाठवण्यात आलेय.

Crime:
Local Body Election : निवडणुकीत भाजपला तुकडाही देणार नाही, अजित पवारांच्या आमदाराच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

नेमकं प्रकरण आहे तरी काय ?

बलात्काराची तक्रार दाखल करताच पोलिसांकडून कसून तपास सुरू करण्यात आला. पोलिसांच्या तपासात असं समोर आले की, अरबिंदु अन् त्याच्या मुलाने काही दिवसापूर्वी नववीतील मुलीसोबत संपर्क साधला. शॉर्ट्स अन् रीलची तिला ऑफर दिली. शूटिंगसाठी मुलीला वेगवेगळ्या जागेवर दोघे घेऊन गेले. लपून लपून मुलीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. त्या व्हिडिओची धमकी देत मुलीवर बलात्कार केला.

बाप आणि मुलांनी नववीच्या मुलीला ब्लॅकमेल करत बलात्कार केला. व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी त्या मुलीला वारंवार दिली जात होती. धमकीला घाबरून मुलीने कुणाला काही सांगितले नाही. अरबिंदुच्या मुलाने मुलीला लग्नाचे आमिष देऊन बलात्कार केल्याचाही आरोप आहे.

Crime:
मोठी बातमी! यशवंत बँकेत तब्बल ११२ कोटींचा घोटाळा, भाजप नेत्यावर गुन्हा, साताऱ्यात खळबळ

पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या कुटुंबाचा अरबिंदूवर विश्वास होता. दोघांनाही मुलीच्या कुटुंबातील लोक ओळखत होते. पण ज्यावेळी पीडितेने घरी तिच्यावर झालेला अत्याचारबाबत सांगितल्यावर सत्य समोर आले. हरोआ पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत बाप आणि मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.

Crime:
Maharashtra Election : एकनाथ शिंदेंना जबर धक्का, भाजप-राष्ट्रवादीची 'या' ठिकाणी झाली युती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com