मोठी बातमी! यशवंत बँकेत तब्बल ११२ कोटींचा घोटाळा, भाजप नेत्यावर गुन्हा, साताऱ्यात खळबळ

Yashwant Cooperative Bank Satara ₹112 crore scam details : साताऱ्यातील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेत तब्बल ₹112 कोटी 10 लाख रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे. भाजप नेते शेखर चरेगावकर आणि माजी आमदाराचा मुलगा नरेंद्र भोईटे यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
Yashwant Bank Fraud:
Yashwant Bank Fraud:Saam TV Marathi
Published On

Satara Yashwant Bank Scam : फलटणमधील यशवंत को-ऑपरेटीव्ह बँकेत तब्बल ११२ कोटी १० लाख रूपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलेय. याप्रकरणी शनिवारी रात्री ५० जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये भाजपचे नेते, सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर आणि फलटणचे माजी आमदार दिवंगत कृष्णचंद्र भोईटे यांचा मुलगा नरेंद्र भोईटे यांचा समोर असल्याचे समोर आले आहे. ११२ कोटींचा घोटाळा उघड झाल्यानंतर साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. (BJP leader Shekhar Charegaonkar booked in Satara bank case)

पुण्यातील शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी याबाबत फिर्याद दिली. यशवंत को-ऑपरेटीव्ह बँकेत संगनमताने कट करून बोगस कर्जांच्या माध्यमातून ११२ कोटी १० लाख ५७ हजार रुपयांचा अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत झालेल्या लेखापरीक्षण व एक एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२४ अशा लेखापरीक्षण पूर्व कालावधीत कार्यरत असलेल्यांवर घोटाळ्याचा ठपका ठेवलाय.

Yashwant Bank Fraud:
Local Body Election : निवडणुकीत भाजपला तुकडाही देणार नाही, अजित पवारांच्या आमदाराच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

कुणाविरोधात दाखल झाले गुन्हे? -

बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, भाजप नेते शेखर चरेगावकर यांच्यासह त्यावेळचे संचालक नरेंद्र भोईटे, रवींद्र टोणपे, चंद्रकांत चव्हाण, अनिल चव्हाण, सुनील पावसकर, सुधीर कुलकर्णी, श्रीकृष्ण जोशी, अवधूत नाटेकर, डॉ. नचिकेत वाचासुंदर, चंद्रकांत कुलकर्णी, गणपतराव निकम, नानासो पवार, पांडुरंग करपे, नितीन रेडेकर, स्नेहन कुलकर्णी, कल्पना गुणे, लक्ष्मण सपाटे, महेशकुमार जाधव, अजित निकम, नानासाहेब पवार, गोपीनाथ कुलकर्णी, संदीप इंगळे, जयवंत जगदाळे, डॉ. प्रदीपकुमार शिंदे, प्रसाद देशपांडे, सुहास हिरेमठ, परशुराम जंगाणी, अनघा कुलकर्णी, विशाल शेजवळ, प्रमोद गिजरे, वसंतराव बोराटे, सुनील मुंद्रावळे, नीलिमा कुलकर्णी, रेखा कुलकर्णी, सचिन साळुंखे, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई, धनंजय डोईफोडे, वैशाली मोकाशी, शाखा व्यवस्थापक वैशाली पावशे, केशव कुलकर्णी, चरेगावकर यांचे भाऊ शार्दूल ऊर्फ मुकुंद चरेगावकर, विठ्ठल ऊर्फ शौनक कुलकर्णी, राही कुलकर्णी, संहिता कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, काशिनाथ कुलकर्णी, सूरज गायधनी, विभिषण सोनावणे, दिनेश नवळे यांच्याविरुद्ध हा गुन्हा नोंद झाला आहे.

Yashwant Bank Fraud:
Marathi vs Hindi clash : आम्ही आहोत म्हणून महाराष्ट्र टिकला, कल्याणमध्ये अमराठी महिलेची मुजोरी, हिंदीतूनच बोलण्यासाठी दमदाटी

आरोप काय केलाय?

यशवंत बँकेचे अध्यक्ष, कर्मचारी व संचालकांनी स्वत:च्या लाभासाठी बँकेचे आर्थिक नुकसान केले. परस्पर संगनमताने ११२ कोटी १० लाख ५७ हजार ४८१ एवढ्या रकमेचा घोटाळा केला. त्यासाठी तब्बल तब्‍बल १९५ बोगस कर्ज खाती तयार करण्यात आली. कर्जास तारण न घेता हेतुपुरस्सर कर्ज वितरण करून जुनी थकीत खाती बंद दाखवून नवीन खाती उघडली. कागदपत्रांमध्ये फेरफार व खोट्या नोंदी तयार करून बँकेच्या निधीचा गैरविनियोग करून घोटाळा केला.

Yashwant Bank Fraud:
Mhada Lottery : ठाण्यात कुणाला लागली लॉटरी? म्हाडाच्या ५३५४ घरांची सोडत जाहीर, अशी पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com