Marathi vs Hindi clash : आम्ही आहोत म्हणून महाराष्ट्र टिकला, कल्याणमध्ये अमराठी महिलेची मुजोरी, हिंदीतूनच बोलण्यासाठी दमदाटी

Marathi vs Hindi clash in Kalyan D Mart full video : डी मार्टममधील मराठी-अमराठी वादानं कल्याणमधील वातावरण तापलं आहे. अमराठी महिलेनं हिंदीतच बोला असे म्हणत अरेरावी केल्याचे समोर आले.
Marathi Vs Hindi Mumbai Video
Marathi Vs Hindi Mumbai VideoSaam TV Marathi News
Published On

Marathi Vs Hindi Mumbai Video : कल्याणमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी असा वाद पेटलाय. डी मार्टमधील एका अमराठी महिलेने मुजोरी केल्याचे समोर आली आहे. 'माझ्याशी मराठीत नाही, हिंदीत बोला' असे म्हणत अमराठी महिलेने दादागिरी केली. मनसेने त्या महिलेला चांगलाच धडा शिकवला. डी मार्टमधील अमराठी महिलेचं त्या कृत्यमुळे कल्याणमध्ये संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून राग व्यक्त केला जातोय. (“Speak in Hindi, Not Marathi” — Kalyan D-Mart Incident Sparks Regional Language Row)

कल्याण पश्चिमेतील डी मार्टमध्ये मराठी अमराठी भाषेवरून मोठा गोंधळ झाला. काउंटरवर खरेदीसाठी आलेल्या एका महिलेने कर्मचार्‍यांना “माझ्याशी मराठीत नाही, हिंदीत बोला” अशी मागणी केली. मात्र कर्मचाऱ्यांनी “मला मराठी येते, मी हिंदीत बोलणार नाही” असे ठाम उत्तर दिल्यावर त्या महिलेने जोरदार गोंधळ घातला. यावेळी त्या महिलेने तुम्ही मराठी लोक कचरा आहात, आमच्या जीवावर जगता, आम्ही आहोत म्हणून महाराष्ट्र टिकला आहे, असे बोलत वातावरण तापवले. मात्र या वेळी त्या ठिकाणी असणार्‍या इतर मराठी ग्राहकांनी या महिलेचा विरोध करत ही माहिती मनसे कार्यकर्त्यांना दिली.

Marathi Vs Hindi Mumbai Video
Local Body Election : जालन्यात राजकीय भूकंप, निवडणुकीआधी महायुती तुटली, पण....

मनसे कार्यकर्त्यांना घटनास्थळी धाव घेत धडा शिकवला. मनसे कार्यकर्त्यांनी डी मार्टच्या बाहेर त्या महिलेचा, तिच्या मुलाचा आणि सोबत असलेल्या लोकांचा जाब विचारत आक्रमक भूमिका घेतली. मनसेच्या या भूमिकेनंतर डी मार्ट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस देखील त्या ठिकाणी दाखल झाले होते. अखेर मनसे कार्यकर्त्यांनी त्या महिलेला माफी मागितल्यानंतरच बाहेर जाण्यास सांगितले. यानंतर त्या महिलेने सर्वांसमोर हात जोडून 'मी मराठी आहे, मी मराठीत बोलते' असे सांगत मनसे कार्यकर्त्यांची माफी मागितली. सध्या खडकपाडा पोलिसांत याविषयी तक्रार दाखल करण्यात आलेय.

Marathi Vs Hindi Mumbai Video
Uddhav Thackeray : तरेंचं न ऐकल्याचा ठाकरेंना पश्चाताप; म्हणाले, '...तर शिवसेना फुटलीच नसती'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com