.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी
Jalna Municipal Corporation election 2025 full political analysis : आगामी काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. प्रत्येक पक्षाकडून राज्यभरात आकड्यांची जुळवाजुळव केली जात आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार महायुती अन् मविआची थेट लढत होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कारण, अनेक ठिकाणी प्रत्येक पक्षाकडून स्वबळावर लढण्याची तयारी करण्यात येतेय. जालन्यात भाजपकडून स्वबळावर लढण्याची तयारी करण्यात आली आहे. जालन्यातली भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी तसे संकेत दिले आहेत. जालना महानगर पालिकेची ही पहिलीच निवडणूक असेल. त्यामुळे प्रत्येक पक्ष सत्ता मिळवण्यासाठी जिवाचे रान करेल. भाजपकडूनही आकड्यांचे राजकारण केले जातेय. स्थानिक भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी साम टीव्हीसोबत बोलताना स्वबळाचा नारा दिला आहे. जालना महानगरपालिकेचा पहिला महापौर भाजपचाच होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. कैलास गोरंट्याल नेमकं काय म्हणाले?
जालना शहर महानगरपालिकेमध्ये निवडून येणारे चेहरे फक्त भाजपकडे आहेत. त्यामुळे निवडणुकीत आम्हाला फ्री हँड द्यावा, अशी मागणी कैलास गोरंट्याल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जालना महानगरपालिका निवडणुकीत महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. त्याशिवाय जालना महानगरपालिकेचा पहिला महापौर भाजपचाच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
जालना शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे संकेत भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी दिले. जालना शहरामध्ये भाजपाची ताकद आहे. त्यामुळे जालना शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 99% मैत्रीपूर्ण लढत होईल अशी प्रतिक्रिया गोरंट्याल यांनी साम टीव्हीसोबत बोलताना दिली आहे. जालना शहर महानगरपालिकेमध्ये 35 पेक्षा अधिक नगरसेवक भाजपाचे निवडून येणार असून पहिला महापौर देखील भाजपचाच होईल असा विश्वास कैलास गोरंट्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान जालना शहर महानगरपालिकेमध्ये निवडून येणारे चेहरे फक्त भाजपकडे आहेत, त्यामुळे निवडणुकीत आम्हाला फ्री हँड द्या, अशी मागणी कैलास गोरंट्याल यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. जालन्यामध्ये काँग्रेस, शिवसेना (शिंदे) यांची ताकदही खूप आहे. त्यामुळे जालन्यामध्ये मनपा निवडणूक रंगतदार होईल, असा अंदाज स्थानिक राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पुढील काही दिवसांत मनपा निवडणुकीच बिगुल वाजणार आहे. त्याआधी भाजपकडून उमेदवराची चाचपणी केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.