Mhada Lottery : ठाण्यात कुणाला लागली लॉटरी? म्हाडाच्या ५३५४ घरांची सोडत जाहीर, अशी पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

MHADA Thane Lottery 2025 चे निकाल जाहीर झाले आहेत. कोकण विभागाने ठाणे आणि वसईतील ५३५४ घरे व ७७ प्लॉटची सोडत काढली आहे. तुमचं नाव विजेत्यांच्या यादीत आहे का? अशी पाहा म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर विजेत्यांची संपूर्ण यादी.
MHADA Housing Lottery
MHADA saam tv
Published On

How To Check MHADA Lottery Winners List : मुंबई आणि उपनगरात प्रत्येकाला घर घेण्याचं स्वप्न असते. पण वाढत्या किंमतीमुळे अनेकांना आपलं घराचं स्वप्न पूर्ण करता येत नाही. सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याचे काम म्हाडाकडून केले जाते. म्हाडाकडून मुंबई आणि उपनगरात परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जातात. शुक्रवारी म्हाडाच्या कोकण विभागाकडून शनिवारी ५३५४ घरे आणि 77 प्लॉटच्या सोडत जाहीर करण्यात आली. त्यामुळे अनेकांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार झालेय.

म्हाडाच्या (Mhada) कोकण गृहनिर्माण मंडळातर्फे ठाणे (Thane), वसई (जि. पालघर) मधील ५३५४ सदनिकाची सोडत शनिवारी जाहीर झाली. ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते लॉटरी काढण्यात आली. यावेळी माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर, सीईओ संजीव जायसवाल उपस्थित होते. (MHADA Lottery 2025: Check Thane Winners List of 5354 Flats and 77 Plots )

MHADA Housing Lottery
Accident : आयटीआयसमोर भीषण अपघात, स्पीड ब्रेकरवर वाहन आदळलं अन् दोन तरुणांचा मृत्यू

स्वप्नातील घराची लॉटरी तुम्ही जिंकलीत का? MHADA 5354 flats winners list PDF download

ठाण्यातील ५३५४ घरांच्या सोडतीनंतर अनेकांचं स्वप्न पूर्ण झालेय. शनिवारी अनेकांचं आपल्या हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झाले. दिवाळीच्या आधीच अनेकांनी दिवाळी साजरी केली. ज्यांना म्हाडाचे घर लागले नाही, त्यांनी निराश न होता, पुन्हा एकदा म्हाडाच्या घरासाठी अर्ज करावा. पुढील काही दिवसात आणकी एकदा म्हाडाच्या घरासाठी लॉटरी जारी करण्यात येणार असल्याचे समजतेय. ठाण्यातील म्हाडाच्या घरासाठी तुम्ही अर्ज केला होता का? तुम्ही म्हाडाच्या घराची लॉटरी जिंकलीत का? म्हाडाच्या घराची लॉटरी कुणाला लागली? म्हाडाच्या सोडतीमध्ये तुम्हाला लॉटरी तर लागली नाही ना? ही यादी कुठे अन् कशी तपासायची, याबाबत जाणून घेऊयात..

  • Step by step guide to check MHADA draw results

MHADA Housing Lottery
Pakistan : एअरस्ट्राइकला तालिबानचं प्रत्युत्तर! पाकिस्तानच्या ५ प्रांतावर हल्ला, १२ सौनिकांचा मृत्यू, अनेक चौक्यांवर कब्जा

म्हाडाच्या विजेत्यांची यादी कशी पाहाल? How to check MHADA lottery winners list 2025

https://housing.mhada.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जा

मेनू विभागात असलेल्या क्विक लिंक्स लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला कोकण बोर्ड विभागात "लॉटरी ड्रॉ निकाल" दिसेल.

त्या फाइल्स डाउनलोड करा अन् विजेत्यांची नावे पाहा

लॉटरी जिंकली की नाही, कसे शोधायचे? MHADA Thane lottery results online link

म्हाडाच्या अधिकृत वेबसाइट https://housing.mhada.gov.in/ ला भेट द्या. अथवा म्हाडा अॅपवरही तुम्ही तपासू शकता.

तुमच्या पॅन कार्ड किंवा इतर क्रेडेन्शियल्ससह लॉग इन करा.

मेनू विभागात "माझे अर्ज" लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर तुम्ही भरलेला फॉर्म नंबर, योजनेचे नाव, श्रेणी टाका..

तुम्ही विजेते आहात की नाही हे दिसेल.

म्हाडाकडून लॉटरी विजेत्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकांवर एसएमएस पाठवण्यात आलेत.

MHADA Housing Lottery
Badlapur Car Scandal : सोसायटीबाहेर कार जोर जोरात हालत होती, महिलांनी हटकलं, त्यांनी त्याच वेगानं ठोकली धूम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com