Accident : आयटीआयसमोर भीषण अपघात, स्पीड ब्रेकरवर वाहन आदळलं अन् दोन तरुणांचा मृत्यू

Ambernath Accident : अंबरनाथ आयटीआयसमोर शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. स्पीड ब्रेकरवर दुचाकी जोरात आदळल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याची तक्रार केली असून, संताप व्यक्त केला आहे.
Accident
AccidentSaam tv
Published On

अजय दुधाणे, अंबरनाथ प्रतिनिधी

Ambernath ITI speed breaker accident details : अंबरनाथमध्ये शनिवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. आयटीआयसमोर असलेल्या स्पीड ब्रेकरमुळे तरूणाची दुचाकी जोरात आदळली अन् दोन जण दूर फेकले गेले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.

अपघाताच्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. स्पीड ब्रेकरमुळे त्या ठिकाणी अनेक अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. आयटीआयसमोर असणारा स्पीड ब्रेकर व्यवस्थित दिसत नसल्यामुळे त्या ठिकाणी अपघाताच्या घटना वारंवार घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Accident
BMC Election : भाजप-ठाकरेंना धक्का, BMC निवडणुकीत नव्या पार्टीची एन्ट्री, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

अंबरनाथ येथील आयटीआय समोर असलेल्या स्पीड ब्रेकरवर शनिवारी रात्री सुमारे अकरा वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. मात्र रुग्णालयात पोहोचेपर्यंत दोघांचा मृत्यू झाला. मृत तरुणांची नावे पवन हमकारे (वय 23) आणि प्रणव बोरक्ले (वय 17) अशी आहेत. मृत दोन्ही तरूण हे मुरलीधर नगरचे रहिवासी आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रूग्णालयात पाठवले अन् रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहन बाजूला केले. पोलिसांकडून या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Accident
ED Raids : ईडीची रिलायन्सवर मोठी कारवाई, अंबानींच्या विश्वासूला ठोकल्या बेड्या

अपघाताच्या भीषण घटनेनंतर रुग्णालयात उशिरा पोहोचल्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त करत पोलिसांसोबत गोंधळ घातला. अंबरनाथ आयटीआय समोर कल्याण–बदलापूर महामार्गावर असलेला स्पीड ब्रेकर नीट दिसत नसल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. अपघातानंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. आयटीआयसमोरील स्पीड ब्रेकरवर वारंवार अपघात होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. त्या स्पीड ब्रेकरसाठी वेगळा पर्यायाचा विचार करण्यात यावा, अशा सूचनाही अनेकदा करण्यात आल्या आहेत. पण अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. स्पीड ब्रेकरमुळे दोन तरूणांचा नाहक बळी गेल्याने स्थानिकांमध्ये संताप आहे.

Accident
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, काही तासात खात्यावर ₹१५०० येणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com