
Jain munis announce the launch of Shantidoot Janakalyan Party : मुंबईतील दादार येथील कबुतरखाना बंद केल्यामुळे जैन समाज संतापलाय. जैन समाजाकडून आगामी मनपा निवडणूक उतरण्याबाबत घोषणा करण्यात आली आहे. जैन मुनींकडून शांतीदूत जनकल्याण पार्टीची घोषणा करण्यात आली आहे. आगामी पालिका निवडणुकीत उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा जैन मुनींनी आज केली. दादारमध्ये कबूतर बचाओ धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकार परिषद आपली भूमिका स्पष्ट केली.
कबुतरांविरोधात जे आहेत, त्यांच्याशी आमचा वाद आहे. दादरमधील कबुतरखाना पुन्हा सुरू करा, अशी मागणी जैन मुनी यांनी केली आहे. महाराष्ट्रात मी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना मानतो, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना आवरावे, असे आवाहन जैन मुनी यांनी केले.
आम्ही राजनिती नाही, तर धर्मनिती करणारे जैन मुनी पक्षाच्या नावाची घोषणा केल्यानंतर म्हणाले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारला काही प्रश्न विचारले. राज्यातील कत्तलखाने बंद का होत नाहीत? कबूतरखानाच बंद का होतोय? सनातन धर्म तुमच्यासोबत आहे. गाय आणि कबुतराला राष्ट्रीय पशु पक्षी घोषित करा. देवेंद्र फडणवीस यांना आमची मागणी आहे आमच्या समाजला पुढे आणा, असे जैन मुनी म्हणाले.
जैन धर्मगुरु म्हणाले की, आम्ही अहिंसने जगणारे आहोत. जर आम्हाला शस्त्र उचलायला लागली तरी आम्ही उचलू. महाराष्ट्रात आंदोलनाने मुंबई आली. आम्ही सनातनचे साधू तुमच्यासोबत आहे. राजकारणी लोक यांना सत्तेवर बसवणारे साधू संत आहेत. यांना कोणी बसवले नसते. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीआधी आम्ही संतानी घरी जाऊन आवाज उठवला, तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, आणि बाकी मंत्री झाले. हजारो साधू संत एकत्र येऊन लढणार आहोत.. आगामी धर्म सभा आम्ही लढणार आहोत. कबुतरांसाठी नागासाधू यांची फौज उभी करू, असे ते म्हणाले.
कबूतर शांती प्रिय प्राणी आहे. जर पशु पक्ष्यांचे सायकल चालली नाही तर नाश होईल. आमचा धर्म सांगतो मरायचं असेल दुसऱ्यासाठी तरी चालेल. रावणासमोर जटायू पक्षी आला होता. त्यामुळे पक्षी किती महत्त्वाचा आहे हे तेव्हापासूनच लोकांना माहिती आहे. एका पक्षासाठी श्रीराम यांनी एवढं केलं. तर या रामाच्या भूमीमध्ये असं व्हायला नको. लोढा नाही आले हे सरकारची मिली बघत आहे. मी डॉक्टरांनापण मूर्ख मानतो एखादा दुसरा मेल्याने काय होतं? असे कैवल्य रत्न महाराज म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.