संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही प्रतिनिधी
Security guard arrested in Kalyan for misbehaving with minor girl : कल्याण खडकपाडा सोसायटी मधील सुरक्षारक्षकाचा काळा कारनामा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सुरक्षारक्षकाने लिफ्टमध्ये ११ वर्षाच्या मुलीसोबत विनयभंग केला आहे. इमारतीच्या लिफ्टमध्ये मुलगी येत असताना त्याने अश्लील चाळे केले. ही धक्कादायक घटना लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. अल्पवयीन मुलींसोबत छेडछाड झाल्याची घटना समजताच सोसायटी अन् परिसरात संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण खडकपाडा परिसरातील हायप्रोफाईल सोसायटीमधील धक्कादायक घटना घडली. सोसायटी मधील सुरक्षारक्षककडून अकरा वर्षीय अल्पवयीन मुलींसोबत छेडछाड करण्याचा प्रकार घडला आहे. इमारतीच्या लिफ्टमध्ये मुलगी येत असताना या सुरक्षारक्षकाने मुलीसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे.
ही गोष्ट जेव्हा इमारतीतील रहिवाशांना माहिती पडताच संतप्त रहिवाशांनी वॉचमनला चोप दिला. संतप्त लोकांनी त्याला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अमोल जगताप असे सुरक्षारक्षकाचे नाव आहे. पोलिसांकडून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण खडकपाडा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. दोन दिवसांपूर्वी डोंबिवलीतील हायप्रोफाइल सोसायटीमध्ये सुरक्षारक्षकाने दोन मुलांना बांधून मारहाण करण्याची घटना ताजी असताना आता हा प्रकार घडला आहे. सुरक्षारक्षक हे सोसायटीमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून नेमलेले असतात पण जर हे रक्षकच जर भक्षकाची भूमिका बजावत असतील तर विश्वास ठेवायचा कुणावर? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. सुरक्षारक्षक नेमताना सुरक्षा एजन्सी आणि सोसायटी यांनी योग्य ती काळजी घेऊन त्याची नेमणूक करण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.