DK Rao Arrest : दाऊदचा कट्टर दुश्मन, गँगस्टर डीके रावच्या मुसक्या आवळल्या, कारण काय ?

Gangster DK Rao in connection extortion case : मुंबई अंडरवर्ल्डमधील कुख्यात गँगस्टर डीके रावला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी आणि धमकी प्रकरणात गुन्हे शाखेने धडक कारवाई करत रावला बेड्या ठोकल्या.
Gangster DK Rao
Mumbai Crime Arrested Gangster DK Rao in connection extortion case :Google
Published On

Mumbai Crime Arrested Gangster DK Rao in connection extortion case : मुंबई अंडरवर्ल्डमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी कुख्यात गँगस्टर डी के राव याला मुंबई पोलीस गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या आहेत. खंडणी आणि धमकी प्रकरणात डीके रावला अटक केली. याबाबत मुंबई पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात डीके राव याच्या मित्राविरोधाची नावेही समोर आली आहेत.

मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील डीके राव हे एक प्रमुख नाव आहे. डीके राव हे दाऊदचा कट्टर विरोधक म्हणून मुंबई अंडरवर्ल्डमध्ये काम करत होता. राव अनेकदा आतापर्यंत तुरूंगात गेलाय. त्याच्याविरोधात वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हे दाखल आहेत. खंडणी अन् धमकी प्रकरणात डीके रावला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Gangster DK Rao
Local Body Elections : मिनी मंत्रालयाचा धुरळा पहिल्या टप्प्यात, आयोग 'या' दिवशी जाहीर करणार निवडणूक?

मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी गँगस्टर डीके रावला अटक केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील एका बिल्डरने कोणाकडून तरी अंदाजे ₹१.२५ कोटी उधार घेतले होते. बिल्डरला ही रक्कम परत द्यायची नव्हती. त्या बिल्डरने त्यामुळे गँगस्टर डीके राव याची मदत घेतली. बिल्डरच्या सांगण्यावरून डीके रावने त्या व्यक्तीला धमकावले.

Gangster DK Rao
Political Controversy : महायुतीच्या मंत्र्याचं कर्जमाफीवरून वादग्रस्त वक्तव्य, शेतकऱ्यांचा राग अनावर, पाटील नेमकं काय म्हणाले?

संबंधित त्या व्यक्तीने याबाबत गँगस्टार डीके राव याच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली. मुंबई पोलिसांनी खंडणी, धमकी यासारख्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 308(4), 61(2) आणि 3(5) अंतर्गत रावच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तक्रारीत असे म्हटले की, बिल्डरकडे १.२५ कोटी रूपये मागितले. त्यावेळी डीके राव आणि त्याचा सहकारी अनिल परेराव यांनी गंभीर परिणामांची धमकी दिली. पोलिसांनी तक्रारीनंतर धडक कारवाई करत गँगस्टर डीके रावला अटक केली.

Gangster DK Rao
Maharashtra politics : ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात पुन्हा खिंडार, शिंदेंच्या शिवसेनेत अनेकांचा प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com