Pune Election : राष्ट्रवादीमधील फूट भाजपच्या पथ्यावर, पुण्यात पुन्हा कमळ फुलणार की घड्याळाची टिकटिक वाजणार?

Pune Mahanagar Palika Election News : पुणे महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप विरुद्ध अजित पवार अशी थरारक लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट भाजपच्या पथ्यावर पडणार का? की अजित पवारांची घड्याळ टिक टिक वाजणार? जाणून घ्या सविस्तर
pune mahanagar palika
pune mahanagar palikaSaam TV Marathi News
Published On

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune Municipal Corporation Election 2025 : अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत, पण त्यांच्यासमोर महानगरपालिकेत सत्ता मिळवण्याचे सत्ताधारी पक्षाचेच मोठे आव्हान असेल. पुणे मनपावर २०१७ मध्ये भाजपने सत्ता मिळवली होती. पवारांचा गड मानल्या जाणाऱ्या पुण्याला भाजपने सुरूंग लावला होता. आता स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्येच लढतीची शक्यता आहे. पुणे मनपासाठी दोन्ही पक्षांमध्ये युतीची चर्चा सुरू आहे. पण स्थानिक पातळीवरील गणितामुळे महायुतीमधील पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. २०१७ मध्ये निवडणूक झाली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अन् शिवसेना अखंड होती. पण आता दोन्ही पक्ष विभागले गेलेत. हेच भाजपच्या पथ्यावर पडेल, असे जाणकार सांगतात. पाहूयात...

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक बिगुल वाजल आहे. मुंबई,पुणे,पिंपरी चिंचवड,छत्रपती संभाजी नगर,नागपूर अशा मोठ्या महानगरपालिका निवडणुकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी यासाठी तयारी सुरू केली.पुणे महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे, त्यामुळे आता राजकीय पक्ष कामाला लागलेत. सपूर्ण राज्याचे नाही तर देशाचे लक्ष पुणे महापालिका निवडणुकीकडे असेल त्याला कारणं ही बरीच आहेत. पुणे महानगरपालिकेची 2022 ला मुदत संपल्यानंतर गेली तीन वर्षापासून प्रशासक राज आहे. त्यामुळे यावेळेस महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे सगळ्याचे लक्ष आहे.

pune mahanagar palika
धक्कादायक! वॉचमनचं लिफ्टमध्ये काळं कांड; ११ वर्षाच्या मुलीवर विनयभंग, घटना सीसीटीव्हीत कैद

2017 ला पुणे महानगरपालिका निवडणुकीत एकूण 162 नगरसेवकांची संख्या होती.. त्यावेळी भाजपने जवळपास नगरसेवकांची शंभरी गाठत 97 नगरसेवक निवडून आणले होते. त्याच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 39,काँग्रेसची 9 शिवसेनेचे 10,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 2,एमआयएमचा 1 आणि अपक्ष 4 नगरसेवक अशी पक्षीय स्थिती राहिली होती. मात्र त्यानंतर आता बरेचसे पुलाखालून पाणी गेले आहे. यावेळेस भाजप,दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस,महाराष्ट्र नवनिर्माण सेना एम आय एम आणि इतर पक्ष निवडणुक लढवतील. भाजपने यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून अनेक इतर पक्षातील इच्छुकांना,माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात घेऊन ताकद वाढवली आहे. यावेळेस पुणे महापालिकेत 165 नगरसेवक निवडून जाणार आहेत.

pune mahanagar palika
Badlapur Car Scandal : सोसायटीबाहेर कार जोर जोरात हालत होती, महिलांनी हटकलं, त्यांनी त्याच वेगानं ठोकली धूम

राज्यात आणि केंद्रात भाजप मोठा पक्ष असल्याने अनेकजण भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळेस पुणे महानगरपालिकेत 125 नगरसेवक आम्ही निवडून असं भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे सांगतायत,तर दुसरीकडे दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी काँग्रेस झाल्याने याचा फायदा भाजपला होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची यावेळी पुणे महापालिकेत नगरसेवक निवडून आणण्यासाठी कस लागणार आहे. अगोदरच प्रभाग रचनेवरून नाराज असलेले अजित पवारांचे नेते त्यातच उपनगरातील मोठे प्रभाग याचा फटका अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची तयारी जोरदार असली तरी त्यांना किती नगरसेवक निवडून आणता येतील हे पहावं लागणार आहे. मात्र आम्ही गेल्या वेळेस पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणून असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

pune mahanagar palika
Sangola Bandh : भाजपच्या रॅलीत आमदाराच्या घरावर हल्ला, सोलापूरचे राजकारण तापलं, सांगोला बंदची हाक

पुणे शहर काँग्रेसची परिस्थिती पाहता शहरात किती नगरसेवक निवडून येतात हे पाहावे लागेल. मात्र आम्ही 35 नगरसेवक निवडून आणून असा विश्वास शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी व्यक्त केलाय. दुसरीकडे भाजप जरी मोठा पक्ष असला तरी त्यांच्यात इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्याचा फायदा इतर पक्षांना होणार आहे. त्यामुळे या संधीचा आम्ही फायदा उठवू असं विरोधक सांगत आहेत. आजच्या स्थितीला सर्वच पक्ष आमच्या चांगल्या जागा निवडून येतील असे सांगत असलं, तरी पुणे शहरात भाजपची ताकद मोठी आहे.शिवसेना शिंदे गट ही आम्ही 35 नगरसेवक निवडून आणू असे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना केलेली कामे आणि आता पुणेकरांसमोर असलेले प्रश्न आम्ही सोडवू असं त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे या महापालिका निवडणुकीतील भाजप मोठे संख्येने नगरसेवक निवडून आणेल अशी आज तरी स्थिती आहे.

pune mahanagar palika
Silver Rate : सुवर्ण बाजारात चांदीला चकाकी, तब्बल २१ हजार रूपयांनी दर वाढले, वाचा सविस्तर

मात्र, पुणे महानगरपालिका निवडणुक पुणे शहरातील अनेक प्रश्नावर लढवली जाईल. शहर वाढले तसे समस्या वाढल्या आहेत. यात सध्या शहरात सर्वात मोठी समस्या आहे ती वाहतूक कोंडी, पाणी,24/7 पाणी योजना, नदी सुधार प्रकल्प मेट्रो,रस्ते हे सगळे प्रश्न गंभीर आहेत. हे प्रश्न सोडवत असताना गेले दहा वर्ष केंद्रात राज्यात भाजप सत्ता आहे. त्यामुळे हे प्रश्न का सोडवले जात नाहीत हा मुद्दा घेऊन विरोधक पुणेकरांसमोर जातील. त्यामुळे जेवढी आजच्या स्थितीला भाजप आणि महायुतीला वरून निवडणुक सोपी वाटत असली तरी आतून अवघड आहे. येणाऱ्या काही दिवसात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात युती आघाड्या होणार का? यावर निर्णय होईल. त्यानंतर बरेच चित्र स्पष्ट होईल मात्र पुणेकर महापालिका निवडणुकीत कोणाला कौल देणार हे पाहावे लागणार आहे.

pune mahanagar palika
Monsoon 2025 : मुंबईतून मान्सूनचा काढता पाय, ३ दिवसात राज्यातून गायब होणार, आज कुठे कुठे कोसळधारा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com