Silver Rate : सुवर्ण बाजारात चांदीला चकाकी, तब्बल २१ हजार रूपयांनी दर वाढले, वाचा सविस्तर

Todays Silver Rate : जळगाव सुवर्ण बाजारात चांदीच्या भावात तब्बल २१ हजार रुपयांची वाढ झाली असून दर प्रतिकिलो एक लाख ७० हजारांवर पोहोचले आहेत. सोनेही प्रतिदहा ग्रॅमला १ लाख २२ हजार २०० रुपयांवर गेले आहे.
Silver Rate Hike
Silver Rate HikeSaam Tv
Published On

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी

Silver price increased by ₹21,000 per kg in Jalgaon market : गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरामध्ये चढ उतार होत आहे. सराफा बाजार उघडताच सोन्याचे आणि चांदीचे दर वाढल्याचे चित्र दिसते. मागील पाच वर्षांच्या तुलनेत चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. चांदीचे दर पावणे दोन लाखांच्या आसपास गेली आहे. मागील पाच वर्षांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवसांत चांदीला आणखी चकाकी मिळण्याची शक्यता आहे.

जळगाव, येथील सुवर्ण बाजारात सोने-चांदीच्या भावाचा उच्चांक वाढतच आहे. गेल्या सहा दिवसांत चांदीच्या भावात प्रतिकिलो २१ हजारांची वाढ होऊन चांदीने एक लाख ७० हजारांचा (विनाजीएसटी) टप्पा गाठला तर सोन्यात चार हजार २०० रुपयांची वाढ होऊन सोने प्रतिदहा ग्रॅमला एक लाख २२ हजार २०० रुपयांवर (विनाजीएसटी) पोहोचले आहे. अमेरिकेने आयात शुल्कात वाढ जाहीर केल्यावर सोने-चांदीच्या भावात सातत्याने मोठी वाढ होत आहे. या निर्णयामुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली.

Silver Rate Hike
Third and Fourth Mumbai : तिसरी आणि चौथी मुंबई नेमकी कोणती आणि कशी, कुठपर्यंत असणार?

सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोने-चांदीकडे वळण्याची प्रवृत्ती वाढली आहे. परिणामी, सोने-चांदीच्या भावांत सातत्याने वाढ होते. सकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावाने जोरदार उसळी घेतली असून, 'एमसीएक्स'वर सोन्याचा भाव ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला. गेल्या शनिवारी (ता. ४) सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला एक लाख १८ हजार रुपये (विना जीएसटी) होता. शुक्रवारी (ता. १०) त्यात चार हजार २०० रुपयांची वाढ होऊन सोने प्रतिदहा ग्रॅमला एक लाख २२ हजार २०० रुपये (विना जीएसटी) आहे. चांदीचा भाव ४ ऑक्टोबरला प्रतिकिलो एक लाख ४९ हजार (विना जीएसटी) होता. त्यात २१ हजारांची वाढ होऊन चांदी प्रतिकिलो एक लाख ७० हजार रुपये (विना जीएसटी) पोहोचली आहे.

Silver Rate Hike
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, काही तासात खात्यावर ₹१५०० येणार

काहीच दिवसात सोन चांदी विना जीएसटी दर

४ ऑक्टोबर सोन १ लाख १८ हजार चांदी एक लाख ४९ हजार

६ ऑक्टोबर सोन १ लाख १९ हजार ५०० चांदी १ लाख ५१ हजार

७ ऑक्टोबर सोन १ लाख २० हजार ५०० चांदी १ लाख ५१ हजार ५००

८ ऑक्टोबर सोन १ लाख २३ हजार चांदी १ लाख ५५ हजार

१० ऑक्टोबर सोन १ लाख २२ हजार २०० चांदी १ लाख ७० हजार

Silver Rate Hike
Sangola Bandh : भाजपच्या रॅलीत आमदाराच्या घरावर हल्ला, सोलापूरचे राजकारण तापलं, सांगोला बंदची हाक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com