Local Body Election : निवडणुकीत भाजपला तुकडाही देणार नाही, अजित पवारांच्या आमदाराच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

Dhamrarao Atram vs BJP local election controversy : धर्मराव बाबा आत्राम यांनी भाजपवर पाच कोटींचा गंभीर आरोप केला. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपला तुकडाही देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.
Ajit Pawar, Dhamrarao Atram, BJP, Gadchiroli politics,
Ajit Pawar, Dhamrarao Atram, BJP, Gadchiroli politics,
Published On

गणेश शिंगाडे, साम टीव्ही प्रतिनिधी

Maharashtra local body elections 2025 seat sharing issue : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला तुकडाही देणार नाही, असा ठाम निर्धार अजित पवार गटाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेय. त्यांच्या विधानाने राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. भाजपने विधानसभेत मला पाडण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपये देऊन माझ्या पुतण्याला विरोधात डमी कॅंडिडेट म्हणून उभे केले. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मी भाजपला एक तुकडा सुद्धा देणार नाही, असे आमदार धर्मराव बाबा आत्राम म्हणाले.

किती मी लढलं पाहिजे आणि किती कुणाला दिलं पाहिजे, हे माझा क्षेत्रात मी ठरवणार आहे. माझ्या विरोधात भारतीय जनता पक्षाने माझ्या पुतण्याला डमी कॅंडिडेट म्हणून उभं केलं. मला पडायला भारतीय जनता पक्षाने पाच कोटी रुपये पुतण्याला दिले. परंतु मला असं सांगायचं आहे की मी त्यांना एक तुकडा सुद्धा देणार नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये फक्त घड्याळच चालेल आणि एकही जागा आम्ही दुसऱ्या पक्षाला देणार नाही, असे वक्तव्य आज आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी चामोर्शी येथे आयोजित जनकल्याण यात्रेत केलेले आहे.

Ajit Pawar, Dhamrarao Atram, BJP, Gadchiroli politics,
Marathi vs Hindi clash : आम्ही आहोत म्हणून महाराष्ट्र टिकला, कल्याणमध्ये अमराठी महिलेची मुजोरी, हिंदीतूनच बोलण्यासाठी दमदाटी

धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, गेल्या ५० वर्षांपासून मी राजकारणात आहे. यादरम्यान कधी यश, कधी अपयश आले, पण जनतेने माझ्यावर विश्वास ठेवत मला विधानसभेत पाठविले आहे. मात्र, भाजपने

माझ्याविरोधात उभे केले, पाच कोटी रुपये खर्च केले, असा आरोप त्यांनी केला. कोनसरी येथील लोहनिर्मिती प्रकल्पात स्थानिकांनाच रोजगार मिळाला पाहिजे. सध्या भेंडाळा परिसरातील १४ गावांतील जमिनी उद्योगासाठी ताब्यात घेण्याच्या हालचाली आहेत, पण आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून एक इंचीही जमीन जाऊ देणार नाही, कोणी शेतकऱ्यांना दबावात घेत असेल तर ते कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

Ajit Pawar, Dhamrarao Atram, BJP, Gadchiroli politics,
....त्यासाठी इंदिरा गांधींना जीवाची किंमत मोजावी लागली, काँग्रेस नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढणार

गडचिरोली चामोर्शी “आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युतीसाठी प्रस्ताव दिला तर ५१ पैकी ३२ जागा मागू; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर लढेल,” असा ठाम इशारा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी रविवारी दिला. “अहेरीत इतर पक्ष आहेतच कुठे?” असे विचारत त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर उपरोधिक टीका केली. ते चामोर्शी नगरपंचायत प्रांगणात झालेल्या जनकल्याण यात्रेच्या सभेत बोलत होते. या सभेला आमदार अमोल मिटकरी, सिने अभिनेत्री अमृता खानविलकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, मान्यवर उपस्थित होते. सभेपूर्वी शहरातून पायी फेरी काढण्यात आली.

Ajit Pawar, Dhamrarao Atram, BJP, Gadchiroli politics,
Maharashtra Live News Update: शरद पवार भाकरी फिरवणार? आबांच्या मुलाला मिळणार मोठी जबाबदारी

धर्मरावबाबा आत्राम यांनी या वेळी भाजपवर गंभीर आरोप करताना म्हटले, “मला विधानसभेत पराभूत करण्यासाठी भाजपने पुतणे अम्ब्रीशराव आत्राम यांना डमी उमेदवार म्हणून उभे केले. पाच कोटी रुपये खर्च केले, तरी जनतेने माझ्या पाठिशी ठाम उभे राहून विजय मिळवून दिला.” ते पुढे म्हणाले, “कोनसरी येथील लोहनिर्मिती प्रकल्पात स्थानिकांनाच रोजगार मिळायला हवा. भेंडाळा परिसरातील १४ गावांची जमीन उद्योगासाठी ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत, मात्र आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. एक इंचीही जमीन जाऊ देणार नाही; कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा आत्राम यांनी यावेळी दिला. सभेला जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ajit Pawar, Dhamrarao Atram, BJP, Gadchiroli politics,
Buldhana : खड्डा चुकवायला गेला अन् घात झाला, केळीचा ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी - मिटकरी

“पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, मात्र महायुती सरकारने भरीव मदत केली असून पुढेही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील,” असे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. “गडचिरोली हा क्रांतीचा आणि संघर्षाचा जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार खंबीरपणे सोबत आहे,” असेही त्यांनी सांगितले.

Ajit Pawar, Dhamrarao Atram, BJP, Gadchiroli politics,
Uddhav Thackeray : तरेंचं न ऐकल्याचा ठाकरेंना पश्चाताप; म्हणाले, '...तर शिवसेना फुटलीच नसती'

...तर स्वबळावर लढणार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युतीसाठी प्रस्ताव दिला तर ५१ पैकी ३२ जागा मागू, अन्यथा राष्ट्रवादी (अजित पवार गट) स्वबळावर लढेल, असे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले. जिल्हा परिषदेसाठी सर्व ५१ व पंचायत समितीच्या १०२ जागा लढविण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अहेरी मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या सर्व १९ जागांवर पक्ष लढेल, असे सांगून त्यांनी तिथे इतर पक्ष आहेतच कुठे, असा प्रश्न करुन भाजपसह काँग्रेस नेत्यांवर उपरोधिक टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com