विधानसभेत गदारोळ; आमदारावर मार्शलची कारवाई, जबरदस्तीने बाहेर नेले

West Bengal Assembly Chaos Kunal Ghosh Evicted: पश्चिम बंगाल विधानसभाेत मोठा गोंधळ उडाला असून टीएमसीचे आमदार कुणाल घोष यांना मार्शल्सच्या मदतीने जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले. भाजप आणि टीएमसी आमदारांमध्ये जोरदार वाद झाल्याने सभागृहात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.
Kunal Ghosh removed by marshals in West Bengal Assembly
Kunal Ghosh removed by marshals in West Bengal Assemblysaam tv
Published On

पश्चिम बंगाल विधानसभाेत बुधवारी मोठा गोंधळ उडाला. तृणमूल काँग्रेसचे (TMC) आमदार कुणाल घोष यांना मार्शल्सच्या मदतीने सभागृहाबाहेर काढण्यात आलं. सभागृहात TMCचे बंडखोर आमदार अखरुज्जमां भाषण करत असताना हा प्रकार घडला. त्याच वेळी कुणाल घोष सभागृहात गेले आणि त्यांच्या भाषणात अडथळा आणू लागले. यामुळे भाजप आमदार तात्काळ घोष यांच्याजवळ पोहोचले आणि दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाढता गोंधळ पाहता विधानसभा अध्यक्षांनी घोष यांना त्यांच्या जागेवर परत जाण्याचे आवाहन केले. मात्र परिस्थिती नियंत्रणात आली नाही. अखेर अध्यक्षांच्या आदेशानुसार मार्शल्सना पाचारण करण्यात आले आणि त्यांनी कुणाल घोष यांना सभागृहाबाहेर नेले.

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, अखरुज्जमां भाषणासाठी उभे राहताच कुणाल घोष त्या ठिकाणी येऊन त्यांच्या समोर उभे राहतात आणि त्यांच्यावर टिप्पणी करतात. यानंतर भाजप आमदारही त्यांच्या जवळ येतात आणि ढकलाढकलीसारखी परिस्थिती निर्माण होते. अध्यक्षांनी अनेकदा घोष यांना त्यांच्या जागेवर जाण्यास सांगितले, पण त्यांनी न ऐकल्याने मार्शल्सनी त्यांना जबरदस्तीने बाहेर काढले.

Kunal Ghosh removed by marshals in West Bengal Assembly
West Bengal Politics: खासदार-आमदारांच्या फुटीनंतर आता अध्यक्षपदही गेलं; राज्यातील राजकारणात मोठी घडामोड

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांच्या पक्षात अंतर्गत मतभेद वाढल्याचे दिसत आहे. अनेक आमदार आणि खासदार बंडखोरीच्या भूमिकेत आहेत. आमदार ऋतब्रत बनर्जी यांनी बंड करत वेगळा गट स्थापन केला असून त्यात सुमारे 60 आमदारांचा समावेश आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ बोस यांनी ऋतब्रत बनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली. ममता बॅनर्जी यांनी शोभनदेब चट्टोपाध्याय यांना विरोधी पक्षनेते म्हणून घोषित केले होते, मात्र 80 पैकी 60 आमदारांनी त्यांना मान्यता देण्यास नकार दिल्याने पक्षात मोठी फूट पडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com