खासदार-आमदारांच्या फुटीनंतर आता अध्यक्षपद गेलं; राज्यातील राजकारणात मोठी घडामोड

TMC Politics: पश्चिम बंगालमध्ये एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. यात तृणमूल काँग्रेसच्या (TMC) बंडखोर आमदारांनी ममता बॅनर्जी यांना पक्षाध्यक्षपदावरून हटवून त्यांच्या जागी अरूप रॉय यांची नियुक्ती केल्याचे वृत्त आहे.
TMC Politics:
WEST BENGAL POLITICAL CRISIS: REBEL MLAS REMOVE MAMATA BANERJEE FROM PARTY PRESIDENT POSTsaam tv
Published On
Summary
  • पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोड घडल्याचा दावा करण्यात आला आहे.

  • बंडखोर आमदारांनी ममता बॅनर्जी यांना अध्यक्षपदावरून हटवल्याचे म्हटले आहे.

  • अरूप रॉय यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली

विधानसभेच्या निवडणुकीपासून पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोडी घडत आहेत. निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर पक्षात उद्भवलेल्या दुफळीनंतर आता ममता बॅनर्जी यांच्या हातातून आता पक्षाची सर्व सूत्रे हातातून जाताना दिसत आहेत. त्याचे कारण म्हणजे, तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी ममता बॅनर्जी यांना अध्यक्षपदावरून हटवलंय.

टीएमसीच्या बंडखोर आमदारांनी 'न्यू टाउन'मधील एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. या बैठकीत ६० आमदार सहभागी झाले होते, तर ७० माजी नगरसेवकही उपस्थित होते. या बैठकीदरम्यान ३० सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली. या बैठकीत बंडखोर गटाने ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना त्यांच्या पदांवरून निलंबित केलंय. तर ममता बॅनर्जी यांना अध्यक्षपदावरून हटवलंय. त्यांच्या जागी हावडा सेंट्रलचे आमदार अरूप रॉय यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

TMC Politics:
Maharashtra Politics: खासदारांनंतर आमदारही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? 3 आमदारांची बैठकीला दांडी

यासह या गटाने अभिषेक बॅनर्जी यांना 'अखिल भारतीय सरचिटणीस' पदावरूनही निलंबित केलंय. तत्पूर्वी, सोमवारी विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनानंतर, बंडखोर टीएमसी (TMC) आमदारांनी न्यू टाउनमधील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीला ६० आमदार आणि ७० माजी नगरसेवक उपस्थित होते.

बैठकीदरम्यान ३० सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली. बैठकीत उपस्थित असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'न्यू टाउन'मधील एका हॉटेलमध्ये झालेल्या बंद-दरवाजा बैठकीत ११ सदस्यांची समिती गठित करण्यात आली. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय कार्यकारी समिती'च्या अध्यक्षपदी माजी मंत्री आणि आमदार अरूप रॉय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

TMC Politics:
'एका व्यक्तीमुळं झालं सगळं! शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर संजय पाटलांनी सांगितलं ठाकरेंची साथ सोडण्यामागचं कारण

बैठकीला कोण-कोण होतं?

मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीला राज्याचे माजी मंत्री जावेद खान आणि अरूप रॉय यांच्यासह कोलकाता महानगरपालिकेचे अनेक नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीसाठी टीएमसीचे (TMC) नाव आणि पक्षाचे चिन्ह वापरण्यात आले होते. मात्र, कार्यक्रमाच्या ठिकाणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे छायाचित्र नव्हते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com