'एका व्यक्तीमुळं झालं सगळं! शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर संजय पाटलांनी सांगितलं ठाकरेंची साथ सोडण्यामागचं कारण

Sanjay Dina Patil: संजय दिना पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्यामागील कारण सांगितलंय. आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सहा खासदारांनी शिंदे सेनेत प्रवेश केला.
 Sanjay Dina Patil:
'ONE PERSON WAS RESPONSIBLE FOR EVERYTHING': SANJAY DINA PATIL REVEALS WHY HE LEFT UDDHAV THACKERAY CAMPsaam tv
Published On
Summary
  • संजय दीना पाटील यांनी अधिकृतपणे शिंदे सेनेत प्रवेश केला.

  • पदासाठी कधीही पक्षात प्रवेश केला नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • ठाकरे गटातील सहा खासदारांच्या निर्णयामुळे राज्यातील राजकारण तापले आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेतून बंडखोरी करत संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर यांनी आज जाहीररीत्या शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर संजय दिना पाटील यांनी त्यांची भूमिका मांडली. मी त्यांच्यासोबत राहावं,असं त्यांना वाटत नाही. तसेच आपण त्यांच्याकडे पक्षात घ्या म्हणून गेलो नव्हतो, मला आमदारकी, खासदारकी द्या म्हणून गेलो नव्हतो, असंही संजय दिना पाटील म्हणालेत.

 Sanjay Dina Patil:
Maharashtra Politics: खासदारांनंतर आमदारही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? 3 आमदारांची बैठकीला दांडी

२०१४ मध्ये प्रताप सरनाईक एबी फॉर्म घेऊन आले होते. मी त्यांच्याकडे आमदारकी, खासदारकी द्या म्हणून गेलेलो नव्हतो, अशा शब्दात त्यांनी आपली खदखद व्यक्त केली. त्या पक्षात मी कार्यकर्त्यांसाठी गेलो होतो, असं म्हणतात संजय पाटील यांनी एका नेत्यावर हल्लाबोल केला. एका व्यक्तीमुळे आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. पक्षातील विभागप्रमुख माझ्या कुटुंबावर जात होता, असं संजय पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले.

ताकदवर लोकं नकोत, त्यांना गुलाम लोक हवीत

२००४, २००९मध्ये संजय राऊत, सुनील राऊत यांनी मदत केली होती, असं संजय दिना पाटील म्हणाले. उद्धव ठाकरे काल मतदारसंघात आले हेच जर अगोदर आले असतं तर हा प्रॉब्लेम झालाच नसता. मला ज्या व्यक्तीबरोबर प्रॉब्लेम होता, त्याला बोलावलं असतं तर ही स्थिती झाली नसती. मी जर गेलो नसतो तर कोरम पूर्ण झाला नसता.

मला बोलावलं असतं तर हे झालं नसतं. मला ज्या व्यक्तीनं शिव्या दिल्या, त्याला माफी मागायला लावली असती तर हे झालेच नसते, असा दावा संजय दिना पाटील यांनी केलाय. पक्षातील नेत्यांना यांना ताकदवर लोकं नको आहेत, यांना गुलाम लोक हवी आहेत. काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही.

 Sanjay Dina Patil:
'मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय!; ओमराजे निंबाळकरांनी सांगितली ठाकरे गट सोडण्याची कारणं

एक नाही तर सहा टायगर आपल्यासोबत- एकनाथ शिंदे

दरम्यान यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात परभणीचे तीन वेळा निवडून आलेले खासदार संजय (बंडू) जाधव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचं शिंदे म्हणाले.

यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, गजानन कीर्तिकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री भरत गोगावले, तसेच पक्षाचे अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. सहा खासदारांचे स्वागत करताना शिंदे म्हणाले की, २२ जून २०२२ रोजी शिवसेना, धनुष्यबाण आणि बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा वाचवण्यासाठी सुरू झालेल्या लढ्याचा हा दुसरा टप्पा आहे. सुरुवातीला ४० आमदार सोबत होते, तर आज सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश करून त्या लढ्याला नवे बळ दिले आहे. "आता एक नाही तर सहा टायगर आपल्यासोबत आहेत," असेही शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com