'मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय!; ओमराजे निंबाळकरांनी सांगितली ठाकरे गट सोडण्याची कारणं

MP Omraje Nimbalkar: धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतलाय. 'ऑपरेशन टायगर' या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट सोडण्यामागची कारणेही त्यांनी सांगितली आहेत.
MP Omraje Nimbalkar:
Why Omraje Nimbalkar left Uddhav Thackeray groupsaam tv
Published On
Summary
  • ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची घोषणा केली आहे.

  • गोवर्धनवाडी येथे समर्थक आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी निर्णय जाहीर केला.

  • त्यांच्या निर्णयामुळे 'ऑपरेशन टायगर'ला मोठे बळ मिळाल्याची चर्चा सुरू आहे.

शिंदे गटात जायचं की नाही जायचं या निर्णयावरून गेल्या दोन दिवसांपासून तळ्यात-मळ्यात करणाऱ्या खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर आपला निर्णय घेतलाय. आज धाराशिव येथील गोवर्धनवाडी गावात जाणून त्यांनी आपल्या समर्थकांसोबत आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी निर्णय घेत आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात काम करणार असल्याचं सांगितलं.

MP Omraje Nimbalkar:
Operation Tiger: ठाकरे गट की शिंदे गट? बंडखोरीच्या चर्चेदरम्यान ओमराजेंनी बोलून दाखवली मनातील खदखद

कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण ठाकरे गट का सोडत आहोत. शिंदे गटाच्या शिवसेनेत का प्रवेश करतोय, याचे कारणही सांगितले. दरम्यान एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरनं संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली. मात्र धारशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयावरून शिंदेंचं ऑपरेशन धोक्यात आलं होतं. जर निंबाळकर यांनी ठाकरे गटात राहण्याचा निर्णय घेतला असता तर इतर खासदारांना गट स्थापन करता आला नसता. त्यांच्यावर अपात्रेची कारवाईदेखील झाली असती. त्यामुळे ओमराजे निंबाळकरांची भूमिका खूप महत्त्वाची बनली होती.

ओमराजेंनी का सोडली उद्धव ठाकरेंची साथ?

पैसा आणि पदाच्या हव्यासापोटी आपण शिंदे गटात प्रवेश केला नाही. सत्तेचा वापर हा सर्वसामन्यांच्या कामसाठी करेन. शिंदेच्या नेतृत्त्वात काम करणार अशी घोषणा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज केली. सामन्य जनता ओमराजे यांना ओळखते, आपण सामन्या लोकांसाठीच कामे केली आहेत, यापुढेही त्यांचीच कामे करेन. परंतु सत्ता नसल्याने निधी मिळत नव्हता. कामे अडलवली जात होती.

MP Omraje Nimbalkar:
Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर' सोपं नाही, खासदाराचं तळ्यात-मळ्यात; एकनाथ शिंदेंचा डाव फसणार? वाचा Inside Story

गेल्या धाराशिवच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्हाला मोठं अपयश आलं. काम करणारी लोकांना निवडणुकीत संधी दिली परंतु त्यांचा ही पराभव झाला. त्यामुळे सामान्य लोकांची कामे करण्यासाठी सत्ता हवी. इतकेच नाही तर निधी नसल्याने विकासकामे करता येत नाहीये, हेही कारण त्यांन शिंदे गटात जाण्याचं सांगितलं.

आपण कोणत्या वैयक्तिक कामसाठी शिंदे गटात जात नाही आहोत, तसेच आपल्यावर ईडी, सीबीआयची धाड ही पडली नाहीये. मी २४ तास काम करणारा कार्यकर्ता आहे. सामान्य लोकांच्या कामसाठीच मी सत्तेचा वापर करेन असं निंबाळकर म्हणालेत.

उद्धव आणि आदित्य ठाकरेंविषयी काय म्हणाले ओमराजे?

खासदार ओमराजे यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा स्नेह मला लाभला. त्यांचे आशीर्वाद लाभले, त्याच्याविषयी माझ्या मनात कधीच वाईट शब्द आली नाहीत आणि येणार देखील नाहीत. आपल्यावर कोणत्याही प्रकारची टीका-टिप्पणी झाली तर आपल्याकडून मातोश्रीविषयी वाईट उद्गगार काढणार नाही, तशा कार्यकर्त्यांनाही त्यांनी सूचना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com