Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर प्रश्नचिन्ह, कुणी पाठवली नोटीस? आता पुढे काय?

NCP News: सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव सच्चिदानंद सिंह यांनी आक्षेप घेत नोटीस पाठवली आहे. निवडणूक अवैध असल्याचा दावा करत पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
Sunetra Pawar :
Sunetra Pawar : Saam TV
Published On

Sunetra Pawar national president election controversy : सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव सच्चिदानंद सिंह यांनी आक्षेप घेतल्याचे समोर आले आहे. निवडणूक अवैध असल्याचा दावा करत पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक अवैध असल्याचे राष्ट्रवादीचे सचिव सच्चिदानंद सिंह यांनी म्हटले आहे. त्यांनी त्याबाबत तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवारांसह प्रफुल्ल पटेल, ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. प्रकरणामुळे राष्ट्रवादीच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. (Sunetra Pawar latest news)

अजित पवार गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण सुरू असल्याचे समोर आले होते. प्रफुल्ल पटेल-तटकरे पक्ष चालवत असल्याचे समोर आले होते.त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी स्वत:चे वर्चस्व दाखवले होते. त्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवार यांनी एकत्र पक्ष चालवण्यास सुरूवात केली होती. पण अतंर्गत वाद असल्याचे स्पष्ट झाले होते. हे आव्हान टिकेल असे वाटत नाही. कारण सुनेत्रा पवार यांची रीतसर पक्षाच्या बैठकीत झाली होती. नियमांनुसार प्रक्रिया पार पडली होती, सर्व आयोगाला कळवले होते. यात काहीही बदल होईल, असे वाटत नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद असल्याचे समोर आलेय.

Sunetra Pawar :
सांगलीत राष्ट्रवादीला मोठा धक्का! महापालिकेतील नगरसेविकेचं पद जाणार? काय आहे कारण?

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव सच्चिदानंद सिंह यांनी पक्षांतर्गत झालेल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. ही निवडणूक कायदेशीर आणि तांत्रिकदृष्ट्या वैध नसून ती पुन्हा घेण्यात यावी, अशी थेट मागणी त्यांनी केली आहे. सिंह यांनी या संदर्भात अधिकृत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

या वादाचे पडसाद आता थेट पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल तसेच ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. पक्षांतर्गत सचिवांनीच थेट पक्षनेतृत्वाला अशा प्रकारे नोटीस पाठवल्याने अजित पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे.

Sunetra Pawar :
Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा; शरद पवार गटानं टाकला मोठा डाव, पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

...तर निवडणूक पुन्हा होणार?

सच्चिदानंद सिंह यांनी केलेल्या तक्रारीत राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक कायदेशीर चौकटीत झाली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करून ती नव्याने आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी, असा आग्रह त्यांनी धरला आहे. पण पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता नाही. सुनेत्रा पवार यांची रीतसर पक्षाच्या बैठकीत झाली होती. नियमांनुसार सर्व माहिती आयोगाला दिली होती.

Sunetra Pawar :
Maharashtra Politics: शरद पवार गटाच्या 'त्या' तीन आमदारांवर कारवाई होणार? काय आहे प्रकरण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com