Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा; शरद पवार गटानं टाकला मोठा डाव, पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Maharashtra Political Twist: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर शशिकांत शिंदे यांनी भाष्य करत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSaam tv
Published On
Summary
  • पुण्यात शरद पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.

  • प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना 2029 च्या निवडणुकांसाठी तयारी करण्याचे निर्देश दिले.

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर बैठकीत महत्त्वपूर्ण भाष्य करण्यात आले.

राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भाष्य केलं. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना 2029 ची तयारी करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

Sharad Pawar
कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

शरद पवार गटाकडून पुण्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची विधानसभा अध्यक्ष,सेलचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना 2029 ची तयारी करण्याच्या सुचना दिल्या. याचबरोबर त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनकरणाबाबत मोठं विधान केलं.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्दयावरून बोलताना शशिकांत शिंदे यांनी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांना महत्त्वाचं आवाहन केलं. पक्षातील कार्यकर्त्यांनी पक्ष विलीनीकरणाच्या चर्चांवर विश्वास ठेवू नये. अशा चर्चा ऐकून विचलित होऊ नका संभ्रम ठेवू नका. पक्षाचं काम करत राहावे, आपल्याला आपल्या सरकार पुन्हा आणायचा आहे. पक्षाचा निर्णय साहेब घेतील आणि साहेब जो काही निर्णय घेतील तो पक्ष म्हणून तुम्हा आम्हाला सगळ्यांना मान्य असेल असं विधान प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले आहे.

Sharad Pawar
ठाकरेंपाठोपाठ पवारांचेही खासदार फुटणार? राष्ट्रवादीचे 3 खासदार NDAच्या संपर्कात?

अजित पवार गटात नाराजी

अजित पवार गटाबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, अजित पवार गटातही नाराजी आहे. अंतर्गत वाद असून त्यांच्या आलबेल नाहीये. 2029 मध्ये हे तिन्ही पक्ष महायुती म्हणून लढतील का यात देखील मोठी शंका आहे. त्यामुळे आपली संघटना मजबूत करण्यासाठी तुम्ही आत्तापासूनच कामाला लागा अशा सुचना शशिकांत शिंदे यांनी केल्या आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसापूर्वी अजित पवार गटातील नेत्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यातील वाद सर्वांसमोर आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com