

रायगडमध्ये तटकरे आणि शिंदेसेनेचं विळा-भोपळ्याचं नातं साऱ्या राज्याला परिचित आहे. असं असूनही राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंनी शिंदेसेनेचं कोकणात वर्चस्व असूनही मुलासाठी उमेदवारी खेचून आणली. एवढंच नव्हे तर मुलगा अनिकेत तटकरेंना बिनविरोध निवडूनही आणलं. आता तटकरेंच्या कुटुंबात खासदार, मंत्रिपदासह आता आमदारकीही आलीय.
तटकरेंनी पालकमंत्रिपदाबाबत समन्वयानं निर्णय घेतला जाणार असल्याचं मोघम उत्तर दिल्यामुळे शिंदेसेनेच्या पदरात काय पडणार हा प्रश्नच आहे. तटकरेंच्या या गुगली राजकारणापुढे रायगड जिल्ह्यातील शिंदेसेना पुरती हतबल झाल्याचे चित्र आहे. महायुतीमध्ये शिंदेसेनेची फरफट होत असल्यानं, अखेर शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी खदखद मांडलीय... निवडणुक लढवली असती तर शेकापप्रमाणे तटकरेंच्या राजकारणाचा अंत झाला असता, असं मोठं विधान दळवींनी केलयं.
मुळात कोकणात शिंदेसेनेचं संख्याबळ सर्वाधिक आहे... त्यामुळे विधानपरिषदेच्या जागेसाठी विकास गोगावले आग्रही असल्याची चर्चा होती... मात्र राष्ट्रवादीनंही या जागेवर दावा केला... ज्यानंतर महेंद्र दळवींची मुलगी जुईली दळवी मैदानात उतरल्या. मात्र तटकरेंनी सूत्र फिरवली आणि वरिष्ठांच्या सूचनेनुसार दळवींनी माघार घेतली.
गेल्या काही महिन्यांपासूनच्या घडामोडी बघितल्या तर वेळोवेळी तटकरेंनी शिंदेसेनेला मात दिल्याचं दिसतं. भरत गोगावले मंत्री असूनही गेली दोन वर्षे सुनील तटकरेंच्या विरोधामुळे त्यांना रायगडचे पालकमंत्रिपद मिळू शकलेले नाही. जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदेसेनेचे सर्वाधिक सदस्य निवडून आले, तरीही तटकरेंनी भाजपला सोबत घेऊन शिंदेसेनेला अध्यक्षपदापासून दूर ठेवल्याची चर्चा आहे..
त्यात म्हसळा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक राष्ट्रवादी सोडून शिंदेसेनेत आले.. मात्र तटकरेंनी अवघ्या 4 दिवसांत आपलं राजकीय वजन वापरून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याची चर्चा आहे...
त्यामुळे कोकणात तटकरे कुटुंबियाचं वाढती राजकीय ताकद शिंदेसेनेसाठी डोकेदुखी ठरतेय... एकाच घरात आमदार, खासदार आणि मंत्रीपद अशी सत्तेतील महत्त्वाची पद असल्यानं तटकरेचं वजन जिल्ह्यात वाढलयं... त्यामुळे येत्या काळात शिंदेसेना आणि राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून मोठा संघर्ष पेटला तर तटकरे माघार घेणार की शिंदेसेना याबाबत उत्सुकता असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.