विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; तीन नेत्यांचे तडकाफडकी राजीनामे

Raigad Politics : महायुतीमधील रायगडच्या जागावाटपाच्या वादावरून शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिले आहेत. विधान परिषद निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.
Raigad Politics :
Eknath Shinde setback before Maharashtra Legislative Council elections
Published On
Summary
  • जागावाटपावरून शिवसेनेत नाराजीचा सूर उमटला

  • राष्ट्रवादी काँग्रेसला जागा मिळाल्याने स्थानिक शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली.

  • आगामी निवडणुकीतील समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सचिन कदम, साम प्रतिनिधी

विधान परिषदेच्या निवडणुकीत रायगडमधील राजकारणात धक्कादायक घटना घडू लागल्या आहेत. विधान परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेते राजकीय वैर विसरून हातमिळवणी केली आहे. मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्याचा हा निर्णय स्थानिक पातळीवरील नेत्यांना आवडला नाहीये. त्याचाच फटका शिवसेनेला बसणार असल्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेनेतील तीन पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी राजीनामे दिलेत.

Raigad Politics :
सत्ता गेली आता पक्ष अन् चिन्ह जाणार? पश्चिम बंगालमध्ये 'महाराष्ट्र पॅटर्न'

आगामी विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे संख्याबळ सर्वाधिक आहे. त्यामुळे कोकणची ही जागी शिवसेनेला मिळावी, छोटा आणि प्रतिस्पर्धी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीला मिळू नये अशी भूमिका शिवसैनिकांची होती. मात्र महायुतीच्या वाटाघाटीत रायगडची ही जागा राष्ट्रवादीला गेली. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे राष्ट्रवादी आणि तटकरे विरोधी बोलणारे शिवसेनेचे नेते गप्प झाले. मंत्री उदय सामंत, कर्जतचे आ. महेंद्र थोरवे अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरायला गेले.

Raigad Politics :
Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

यामुळे रायगडमधील शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सुरू उमटू लागला आहे. शिवसैनिकांमधील नाराजी सर्व प्रथम कर्जत मतदार संघातील खालापुर तालुक्यात दिसून आली. येथील खालापुर तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी राजीनामा पत्र थेट सोशल मिडियावर व्हायरल करीत आपली नाराजी स्पष्ट केली. यानंतर संभाजी जगताप, जिल्हा संघटक आणि संदेश पाटील, तालुकाप्रमुखांनी आपला राजीनामा दिला आहे.

गेली अनेक वर्ष रायगडमध्ये शिवसेनाविरूद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पहायला मिळतो. महायुती म्हणून नेते एकत्र येत असले तरी कार्यकर्त्यांमध्ये टोकाचा संघर्ष झाल्याच्या एक ना अनेक घटना आहे. त्यात काल विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला सहकार्य करण्याच्या निर्णयानंतर शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सुरू दिसून येत आहे. रायगडमधील निवडणुका शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष कायमच समोरासमोर लढले आहेत. शिवसेनेत स्थानिक पातळीवर नेते बदलले असले तरी राष्ट्रवादीमध्ये सुनिल तटकरे यांची एकहाती सत्ता राहिली आहे.

यामुळे पक्षातील लढाईत शिवसेना विरूद्ध तटकरे असा सामना अनेकवेळा पहायला मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये शिवसेना राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर एकमेव आणि प्रथमच आमदार झालेल्या राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना पालक मंत्रिपद दिल्याने शिवसैनिक, पदाधिकारी आणि नेत्यांमधील असंतोष उफाळून आला. आमदार भरत गोगावले यांच्या रुपाने रायगडला शिवसेनेचा पालकमंत्री मिळावा, अशी मागणी केली. त्यानंतर शिंदे सरकार आणि आत्ता फडणवीस सरकारमध्ये देखील रायगडला शिवसेनेचा पालकमंत्री मिळावा, यासाठी शिवसैनिक संघर्ष करत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे खोडा घालत असल्याचा आरोप ही अनेकवेळा झाला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनाविरूद्ध राष्ट्रवादी हा वाद अधिक चिघळला होता. कर्जतमध्ये आमदार महेंद्र थोरवे, अलिबागमध्ये आमदार महेंद्र दळवी आणि महाडमध्ये आमदार भरत गोगावले यांना पाडण्यासाठी तटकरे यांनी काम केल्याचे आरोप करण्यात आला होता. रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालिका निवडणुका शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकमेका विरोधात लढल्या. जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष असून देखील शिवसेनेला सत्तेत येण्यासाठी संघर्ष करावा लागला. यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी हा वाद अधिकच चिघळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com