Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या नगराध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, ४ दिवसांपूर्वी झाली होती निवड; राजकीय घडामोडींना वेग

Raigad Politics: रायगडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. चार दिवसांपूर्वी निवड झालेल्या शिंदेसेनेच्या नगराध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे आता रायगडच्या म्‍हसळा नगरपंचायतीच्‍या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचाच नगराध्यक्ष विराजमान होणार आहे.
Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या नगराध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, ४ दिवसांपूर्वी झाली होती निवड; राजकीय घडामोडींना वेग
Deputy Eknath Shinde Saam tv
Published On

Summary:

  • रायगडमध्ये मोठी राजकीय घडामोड

  • म्हसळा नगराध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

  • शिंदेसेना आणि राष्ट्रवादीतील संघर्ष वाढला

  • सुनील तटकरे यांची राजकीय गुगली

सचिन कदम, रायगड

रायगड जिल्‍हयात आज नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्‍या. चार दिवसांपूर्वी म्‍हसळा नगरपंचायतीच्‍या नगराध्यक्षपदी विराजमान झालेले शिवसेना शिंदेगटाचे शाहीद जंजीरकर यांनी आज नगराध्‍यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. रायगडच्या जिल्‍हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांनी राजीनामा सोपवला. आजच्‍या या उलथापालथीची रायगडच्‍या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सुनील तटकरे यांच्‍या राजकीय गुगलीनंतर शिंदेंच्या नेत्याने नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे. सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्‍यातील शहकाटशहाच्‍या राजकारणात कार्यकर्त्‍यांचे मात्र सँडवीच होत असल्‍याचे दिसत आहे.

वरीष्‍ठांच्‍या आदेशानुसार आपण राजीनामा देत असल्‍याचे शाहीद जंजीरकर यांनी एका वाक्‍यात सांगून टाकले. म्हसळा नगर पंचायतीवर गेली १० वर्षे राष्‍ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता होती. मात्र सहा महिन्‍यांपूर्वी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या सात नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करून सुनील तटकरे यांना मोठा धक्का दिला. या ७ नगरसेवकांच्‍या विरोधात राष्‍ट्रवादी काँग्रेसने जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडे अपात्रता याचिका दाखल केली. त्‍यावरील सुनावणी पूर्ण होवून जिल्‍हाधिकारी यांनी या सातही नगरसेवकांना अपात्र ठरवले. दरम्‍यानच्‍या काळात म्‍हसळा नगर पंचायतीच्‍या नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली. त्‍यामुळे या अपात्र नगरसेवकांचा जीव टांगणीला लागला. जिल्हाधिकारी यांच्‍या निर्णयाविरोधात त्‍यांनी नगरविकास विभागाकडे अपील केले. त्‍यावर सुनावणी होऊन जिल्‍हाधिकारी यांच्‍या निर्णयाला स्‍थगिती देण्‍यात आली. त्‍यामुळे या सातही नगरसेवकांना मोठा दिलासा मिळाला.

Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या नगराध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, ४ दिवसांपूर्वी झाली होती निवड; राजकीय घडामोडींना वेग
Maharashtra politics : शिंदेंकडून धक्कातंत्राचा वापर, दिग्गज नेत्याला दिली आमदारकीची ऑफर, विधान परिषद निवडणुकीत ट्वीस्ट

गुरूवारी म्‍हसळा नगरपंचायतीच्‍या नगराध्‍यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणूकीत शिवसेनेने शाहीद जंजीरकर यांना उमेदवारी दिली. त्‍यांनी काँग्रेस नगरसेवकांच्‍या मदतीने राष्‍ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेडगे यांचा ९ विरूद्ध ६ मतांनी पराभव केला आणि शाहीद जंजीरकर नगराध्‍यक्षपदी विराजमान झाले. त्‍यानंतर शिवसेनेच्‍या कार्यकर्त्‍यांनी एकच जल्‍लोष केला. शिंदेच्या शिवसैनिकांनी म्‍हसळा नगरपंचायतीवर पहिल्‍यांदाच भगवा फडकल्‍याचा आनंद साजरा केला. त्यानंतर त्यांनी नगराध्‍यक्षांच्‍या दालनातील सुनील तटकरे यांचा फोटो हलवून तिथे एकनाथ शिंदे आणि बॅ.ए. आर. अंतुले यांचे फोटो लावले.

Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या नगराध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, ४ दिवसांपूर्वी झाली होती निवड; राजकीय घडामोडींना वेग
Maharashtra Politics: ठाकरेंच्या युवा नेत्याचं अपघाती निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

म्‍हसळयातील सत्‍तेवरून सुरू असलेले राजकारण हे खसदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्‍यातील शहकटश‍हाचा परीपाक आहे. म्‍हसळा नगरपंचायतीवर भगवा फडकवून मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांना धक्का दिला होता. मात्र चारच दिवसांत सुनील तटकरे यांच्‍या गुगलीने शिवसेनेची विकेट घेतली. शिवसेनेच्‍या विजयाचा उधळलेला गुलाल खाली बसण्‍यापूर्वी नगराध्‍यक्ष जंजीरकर यांच्‍यावर राजीनामा देण्‍याची नामुष्‍की आली.

Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या नगराध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, ४ दिवसांपूर्वी झाली होती निवड; राजकीय घडामोडींना वेग
Maharashtra Elections: मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा धुरळा उडणार, विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक

जिल्‍हा परीषद निवडणूकीनंतर जिल्‍हयात शिवसेना, राष्‍ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांनी एकत्र येत सत्‍ता स्‍थापन केली. तेव्‍हापासून जिल्ह्यात सामंजस्‍याचे राजकारण करण्‍याचा निर्णय या तिन्ही पक्षांनी घेतला होता. परंतु म्‍हसळा नगराध्‍यक्षपदावरून पुन्‍हा एकदा ठिणगी पडली. म्‍हसळा नगराध्‍यक्षपदाबाबतही नगराध्‍यक्षपदाच्‍या निवडणूकीपूर्वी सामंजस्‍याची भूमिका घेण्‍याचा प्रयत्‍न झाला होता. परंतु तो असफल ठरला. आता पुन्‍हा एकदा सुनील तटकरे आणि उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍यातील चर्चेअंती समेट झाल्‍याची चर्चा झाल्‍याची राजकीय वर्तुळात सुरू आहे. म्‍हसळा नगरपंचायतीची चालू टर्म संपायला सात महिने उरले आहेत. यात सुरूवातीचे तीन महिने राष्‍ट्रवादी काँग्रेस आणि नंतरचे चार महिने शिवसेनेला नगराध्‍यक्षपद असा तोडगा निघाल्‍याचे सांगितले जाते.

Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या नगराध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, ४ दिवसांपूर्वी झाली होती निवड; राजकीय घडामोडींना वेग
Maharashtra Politics: ठाकरे गटात अंतर्गत वाद उफाळला; 82 पदाधिकाऱ्यांचे धडाधड राजीनामे, सामूहिक राजीनाम्यांनी राज्यात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com